आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं. पण तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गुजरात टायटन्स पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर आरसीबीला प्रथम फलंदाजी करावी लागली. पॉवर प्लेमध्येच आरसीबीचे दिग्गज खेळाडू तंबूत परतले होते. त्यामुळे धावगती मंदावली होती. आरसीबीने लिविंगस्टोनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 8 गडी गमवून कसं बस 169 धावांपर्यंत मजल मारली. तसेच गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गुजरात टायटन्सने 2 गडी गमवून पूर्ण केलं. कर्णधार शुबमन गिल स्वस्तात बाद झाल्यानंतर साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी मोर्चा सांभाळला. जोस बटलरने अर्धशतक ठोकलं आणि विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं. गुजरातने 8 विकेट आणि 13 चेंडू राखून आरसीबीचा पराभव केला. या पराभवामुळे पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दोन सामन्यात विजयानंतर 4 गुण आणि +2.266 नेट रनरेट होता. तसेच गुणतालिकेत पहिलं स्थान होतं. पण गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्याने दोन गुण तर गेले. दुसरं नेट रनरेटमध्ये मोठं नुकसान झालं आहे. आता आरसीबीचे 4 गुण असून नेट रनरेट हा +1.149 इतका आहे. आरसीबीची तिसर्या स्थानी घसरण झाली आहे. आरसीबीच्या पराभवामुळे पंजाब किंग्सला फायदा झाला आहे. पंजाबचा संघ 4 गुण आणि +1.485 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर पोहोचल आहे. दिल्ली कॅपिटल्स 4 गुण आणि +1.320 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
गुजरात टायटन्सने 4 गुण आणि +0.807 नेट रनरेटसह चौथ्या, मुंबई इंडियन्स 2 गुण +0.309 नेट रनरेटसह पाचव्या, लखनौ सुपर जायंट्स 2 गुण आणि -0.150 नेट रनरेटसह सहाव्या, चेन्नई सुपर किंग्स 2 गुण आणि -0.771 नेट रनरेटसह सातव्या, सनरायझर्स हैदराबाद 2 गुण आणि 0.871 नेट रनरेटसह आठव्या, राजस्थान रॉयल्स 2 गुण आणि -1.112 नेट रनरेटसह नवव्या आणि कोलकाता नाईट रायडर्स 2 गुण आणि -1.428 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.