भारताचे एकूण क्षेत्रफळ 32 लाख 87 हजार 263 चौरस किलोमीटर असून जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेला देश आहे.
भारतातील असे कोणतेी पाच राज्य आहेत, जे क्षेत्रफळांच्या दृष्टीने सर्वात मोठी मानली जातात.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान असून त्याचे एकूण क्षेत्रफळ 3 लाख 42 हजार 239 चौरस किलोमीटर इतके आहे. हे राज्य लोकसंख्येमध्ये देशातील तिसऱ्या क्रमांकावर येतो.
राजस्थानची स्थापना 30 मार्च 1949 मध्ये करण्यात आली असून या राज्याची राजधानी जयपूर आहे.
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य मध्य प्रदेश आहे. ज्याचे क्षेत्रफळ 3 लाख 08 हजार 252 चौरस किलोमीटर इतके आहे.
या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली असून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे.
तिसऱ्या क्रमांकासह महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3 लाख 7 हजार 713 चौरस किलोमीटर आहे. या राज्याची स्थापना 1 मे 1960 झाली.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून येथे असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भारताचं प्रवेशद्वार म्हटलं जातं.
भारतातील उत्तर प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं चौथ्या क्रमांकावर येत असून राज्याचे क्षेत्रफळ 2 लाख 43 हजार 284 चौरस किलोमीटर इतके आहे.
पाचव्या क्रमांकासह गुजरातची एकूण क्षेत्रफळ 1 लाख 96 हजार 024 चौरस किलोमीटर आहे. या राज्याची स्थापना 1 मे 1960 झाली असून राजधानी गांधीनगर आहे.