भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी (२ एप्रिल) मायदेशात २०२५ वर्षात होणाऱ्या भारतीय संघाच्या सामन्यांचे वेळापत्रक घोषित केले आहे. या वर्षात भारतीय संघाला वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय मालिका खेळायच्या आहे.
मायदेशातील २०२५ हंगाम वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेने २ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू होणार आहे.
या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादला खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना १० ऑक्टोबरपासून कोलकातामध्ये खेळवला जाईल. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ कसोटी, टी२० आणि वनडे या तिन्ही प्रकारातील मालिका खेळण्यासाठी भारत दौरा करणार आहे. यादरम्यान कसोटी मालिकेतील एक सामना गुवहाटीमध्येही होणार आहे.
गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना आयोजित केला जाणार आहे. ही कसोटी मालिका १४ नोव्हेंबर रोजी सुरू होईल. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे आणि ५ सामन्यांची टी२० मालिका होईल.
वेस्ट इंडिजचा भारत दौरा कसोटी मालिका (वेळ - स. ९.३० वा)२ - ६ ऑक्टोबर २०२५ - पहिला सामना, अहमदाबाद
१०-१४ ऑक्टोबर २०२५ - दुसरा सामना, कोलकाता
१४-१८ नोव्हेंबर २०२५ - पहिला सामना, नवी दिल्ली
२२ - २६ नोव्हेंबर २०२५ - दुसरा सामना, गुवाहाटी
३० नोव्हेंबर २०२५ - पहिला सामना, रांची
३ डिसेंबर २०२५ - दुसरा सामना, रायपूर
६ डिलेंबर २०२५ - तिसरा सामना, विशाखापट्टणम
९ डिसेंबर २०२५ - पहिला सामना, कटक
११ डिसेंबर २०२५ - दुसरा सामना, चंदिगढ
१४ डिसेंबर २०२५ - तिसरा सामना, धरमशाला
१७ डिसेंबर २०२५ - चौथा सामना, लखनौ
१९ डिसेंबर २०२५ - पाचवा सामना, अहमदाबाद