वक्फ सुधारित विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत सादर करण्यात आले. त्यावर राज्यसभेत चर्चा आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक राज्यसभेत सादर केले. या विधेयकावर राज्यसभेत आजच मतदान होईल.
Chandrashekhar bawankule : भाजपने पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही ठेवलावक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. वक्फ विधेयकावरून मोदी सरकारला मोठं यश मिळालंय आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान करण्यात आलं. वक्फ विधेयकात पारदर्शीपणा नाही, सरकारचा हेतू योग्य नसल्याची टीका ठाकरे गटाने केली. ठाकरे गटाच्या या भूमिकेवर मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत शिवसैनिक आहेत. अनेक लोक पक्ष सोडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Uddhav Thackeray : भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर केली टीकाबहूचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक मंजुरी मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. वक्फ दुरुस्ती विधेयकाने भाजपचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे असल्याचे पुढे आले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Adinath Sugar Factory : आजी-माजी आमदारांचे पॅनेल आमने-सामनेकरमाळा तालुक्यातील राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धक, माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनलमध्ये लढत होणार आहे.
वक्फ सुधारणा विधेयकावर आज राज्यसभेत फैसलावक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजुर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली. तर, विरोधात 232 मते पडली. आज या विधेयकावर राज्यसभेत चर्चा होणार असून त्यावर मतदान होणार आहे. राज्यसभेत भाजपप्रणित एनडीएला राज्यसभेत बहुमत आहे. या बहुमतामुळे हे विधेयक राज्यसभेत सहज मंजुर होईल.
टॅरिफच्या घोषणेमुळे भारतीय शेअर बाजारात कोसळलाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर तब्बल 26 टक्के टॅरिफ लावण्याची घोणा केली. या निर्णयानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स 450 अंकांनी खाली घसरला. गुंतवणुकदारांचे अंदाजे 3.27 लाख कोटी रुपयांच नुकसान झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका; दरकपातीला स्थगितीमहाराष्ट्राती वीज ग्राहकांनाच्या वीजबील वाढीला स्थगिती देण्यात आली होती. हळूहळू हे वीजबील आणखी कमी करण्याचे धोरण होते. मात्र, एमएसबीच्या विनंतीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर टॅरिफ हल्लाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभारातील देशांवर टॅरिफ लावत असल्याचे घोषणा केली. त्यानुसार आता भारतावर देखील तब्बल 26 टक्के टॅरिफ लावत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
President's rule in Manipur : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूरमणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल लोकसभेत ठेवला. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला ठाकरेंच्या शिवसेनेने देखील पाठिंबा दिला आहे.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड दौऱ्यावरपंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर जाणार आहेत. आज होणाऱ्या सहाव्या बिमस्टेक परिषदेत ते सहभागी होणार आहेत.
Mumbai Crime Branch: मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 5 आरोपींकडून 7 पिस्तुल जप्तमुंबईतून 7 पिस्तुल आणि 21 जिवंत काडतूसासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अटक केलेले आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे. विकाश ठाकूर, सुमितकुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेककुमार गुप्ता अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी हरियाणा, बिहार आणि राजस्थानमधून आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Waqf Amendment Bill : वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूरअखेर बुधवारी मध्यरात्री वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. त्यांनंतर दुपारी 12 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या मतदानानंतर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. यावेळी विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली. तर, विरोधात 232 मते पडली. मात्र, वक्फ दुरूस्ती विधेयकावरील मतदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र गैरहजर होते.