Tomato Dosa Recipe: तुम्हाला एकाच प्रकारचा डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला खास पदार्थ सांगणार आहोत. तुम्ही सकाळी नाश्त्यात टोमॅटो डोसा तयार करू शकता. टोमॅटो डोसा बनवणे सोपा असून चवदार देखील आहे. तसेच टोमॅटोमध्ये असलेले घटक आरोग्यदायी असतात. टोमॅटो डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.
'टेस्टी टोमॅटो डोसा' बनवण्यासाठी लागणारे साहित्यटोमॅटो
लाल तिखट
पाणी
मीठ
जिर
तेल
गव्हाचे पीठ
तांदळाचे पावडर
रवा
जीरं
कोथिंबीर
टेस्टी टोमॅटो डोसा बनवण्याची कृतीटेस्टी टोमॅटो डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी टोमॅटो , आलं, लाल तिखट आणि पाणी मिक्सरमध्ये चांगेल बारिक करून घ्यावे. नंतर तांदळाचे पावडर, गव्हाचे पीठ, रवा, जीर, मीठ, ओवा, कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून चांगले मिसळा. नंतर तवा गरम करा आणि त्यावर टोमॅटो डोसा तयार करा.