रायगड गार्डियन मंत्री: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारीला पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली होती. यात रायगडमध्ये अजित पवार गटाच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिक जिल्ह्यासाठी भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे समर्थक थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, टायर जाळून रस्ता अडवला होता. तर नाशिकमध्ये देखील मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर अवघ्या एक दिवसातच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला देण्यात आलेली स्थगिती अजूनही कायम आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या रायगड दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा (Raigad Guardian Minister) तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगवले यांना मिळणार की अदिती तटकरे यांच्या नावाची पुन्हा एकदा घोषणा होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 12 एप्रिलला ते रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील. अमित शाह यांच्या दौऱ्यात पालकमंत्रीपदाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शाह हे सुनील तटकरे यांच्याकडे सुतारवाडीला रवाना होणार आहेत.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..