आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 15 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे कोलकातमधील ईडन गार्डन्ससध्ये (Eden Gardens) करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. हैदराबादने टॉस जिंकला. कर्णधार पॅट कमिन्स याने चेसिंगचा निर्णय घेत यजमान केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता केकेआर घरच्या मैदानात किती धावांपर्यंत मजल मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
हैदराबाद आणि कोलकाता या दोन्ही संघांची या हंगामात सारखीच स्थिती आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण चौथा सामना आहे. दोन्ही संघांनी पहिल्या 3 पैकी 2 सामने गमावले आहेत. तर एकमेव सामना जिंकला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसमोर कमबॅक करुन विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये फक्त 1 बदल केला आहे. स्पेन्सर जॉन्सन याच्या जागी ऑलराउंडर मोईन अली याचा समावेश करण्यात आला आहे. आता मोईन या संधीचा किती सोनं करतो? याकडे टीम मॅनजमेंटचं लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सनरायजर्स हैदराबाद टीममध्ये सिमरजीत सिंह याचं कमबॅक झालं आहे. तर कामिंदु मेंडीस याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
हैदराबादचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, मोईन अली, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि रमणदीप सिंग.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), कामिंडू मेंडिस, सिमरजीत सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि जीशान अन्सारी.