Salman Khan Lookalike Arrest: रस्त्यावर असभ्य वर्तन; सलमान खानला अटक? पोलिसांची मोठी कारवाई
Saam TV April 03, 2025 11:45 PM

Duplicate salman khan Arrest : लखनऊमध्ये स्वतःला अभिनेता सलमान खानचा डुप्लिकेट समजणाऱ्या आजम अन्सारीला पोलिसांनी अटक केली आहे. तो सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत होता आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांशी गैरवर्तन करत होता. मंगळवारी लखनऊमधील ठाकुरगंज पोलिसांनी हुसैनाबाद येथील घंटाघर परिसरात ही कारवाई केली.

आजम अन्सारी हा लखनऊच्या चौपटिया भागातील रहिवासी आहे. तो सलमान खानप्रमाणे कपडे परिधान करून, त्यांच्या शैलीची नक्कल करत रस्त्यावर रील तयार करत होता. त्यामुळे लोकांची एकच गर्दी झाली आणि वाहतुकीची कोंडी होऊ लागली. यापूर्वीही त्याने सार्वजनिक ठिकाणी कपडे काढून व्हिडिओ तयार केले आहेत, त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी त्याच्या वर्तनाबद्दल तक्रारी केल्या आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आजम अन्सारी याने रस्त्यावर सिगारेट ओढणे, कपडे काढणे आणि च्या '' चित्रपटातील दृश्यांची नक्कल करणे असे कृत्य केले. त्याच्या या वर्तनामुळे सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवली जात होती आणि लोकांना याचा त्रास होत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

आजम अन्सारीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत. त्याच्या यूट्यूब चॅनलवर 1.67 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, यावर तो नियमितपणे सलमान सारखे व्हिडिओ अपलोड करतो. पोलिसांनी त्याला इशारा दिला आहे की, भविष्यात अशा प्रकारचे वर्तन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.