अवकाळीने आंबा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
esakal April 04, 2025 12:45 AM

-rat३p१९.jpg-
२५N५५३१८
राजापूर ः आंबा कलमांवरील काळंवडलेला मोहोर.
----
अवकाळीने आंबा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः तालुक्यात बुधवारी (ता. २) मध्यरात्री अवकाळी पाऊस बरसला. सोसाट्याच्या वाऱ्याच्या जोडीने ढगांचा जोरदार गडगडाट करीत सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ पाऊस पडला. त्यामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा रात्री खंडीत झाला होता. सकाळी दहानंतर खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत झाला. या पावसामुळे आंबा पिकावर बुरशी आणि फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बागायतदारंकडून व्यक्त केली जात आहे.
सातत्याने राहणाऱ्या प्रतिकूल वातावरणामुळे यावर्षी आंबा उत्पादन गतवर्षीच्या तुलनेमध्ये घटले आहे. वाढते तापमान आणि आता अवकाळी पावसाने आंबा हंगामाला घेरले आहे. दोन दिवसांतील अवकाळी पावसामुळे बुरशी आणि फळमाशीचा प्रादुर्भाव वाढून त्यातून, नुकसानीची झळ पोहचण्याची शक्यता बागायतदारांकडून वर्तविला जात आहे.
---
कोट
वाढत्या तापमानाचा आंब्याला फटका बसत असताना त्यामध्ये अवकाळी पावसाची भर पडली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यावर बुरशी आणि फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने फळपिक विमाअंतर्गंत नुकसानीच्या पलीकडे जावून बागायदारांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे.
--ओंकार प्रभूदेसार्ई, आंबा बागायतदार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.