Veteran actor,director Manoj Kumar passes away : देशभक्तीपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले आणि 'भारत कुमार' म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले.
मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘मेरे देश की धरती सोने उगला’ आणि ‘भारत की बात सुनाता हूं’ यांसारख्या गाण्यांमधून देशातील आबालवृद्धांत लोकप्रिय झाले. मनोज कुमार यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधील अॅबटाबाद येथे 1937 साली झाला.
(बातमी अपडेट होत आहे.)