LSG vs MI : मुंबई इंडियन्सचा तिसरा पराभव, लखनौचा रंगतदार सामन्यात विजय, घरच्या मैदानात पलटणवर 12 धावांनी मात
GH News April 05, 2025 03:06 AM

लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 16 व्या सामन्यात 12 धावांनी विजय मिळवला आहे. लखनौने मुंबईला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. रंगतदार झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादव याने केलेल्या खेळीमुळे मुंबई सामन्यात कायम राहिली. मात्र सूर्या निर्णायक क्षणी आऊट झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने मुंबईची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत विजयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्दिकला या प्रयत्नात तिलक वर्मा याची साथ मिळाली नाही. त्यामुळे मुंबई सामन्यात पिछाडीवर गेली. लखनौ अशाप्रकारे मुंबईला विजयापासून 12 धावांनी दूर ठेवण्यात यशस्वी ठरली. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 191 धावाच करता आल्या. लखनौने यासह दुसरा विजय मिळवला. तर मुंबईचा हा तिसरा पराभव ठरला.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप आणि आवेश खान.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेन्ट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चहर आणि विघ्नेश पुथूर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.