मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 18 व्या मोसमातील दुसरा तर एकूण तिसरा सामना गमावला आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौ सुपर जायंट्सने मुंबईवर 12 धावांनी मात करत दुसरा विजय मिळवला आहे. लखनौने मुंबईला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने या धावांचा शानदार पाठलाग करत सामन्यात आव्हान कायम ठेवलं. मात्र लखनौने निर्णायक क्षणी सूर्यकुमार यादव याला आऊट केलं आणि तिलक वर्मा याला बांधून ठेवलं. तर कर्णधार हार्दिक पंड्या याला दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने मुंबईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 191 धावाच करता आल्या. मुंबईला या पराभवानंतर आणखी एक झटका लागला आहे. मुंबईची पॉइंट्स टेबलमध्ये घसरण झाली आहे.
लखनौला या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये जितका फायदा झालाय तितकंच मुंबईला नुकसान झालं आहे. लखनौने विजयासह सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. लखनौ सामन्याआधी सातव्या क्रमांकावर होती. तर मुंबईची सहाव्या स्थानावरुन सातव्या स्थानी घसरण झाली आहे. मुंबईचा पराभवानंतर नेट रनरेट हा +0.108 असा आहे जो सामन्याआधी +0.309 असा होता. तर लखनौचा नेट रनरेट -150 होता. विजयानंतर या नेट रनरेटमध्ये सुधार झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, लखनौचा नेट रनरेट +0.048 असा झाला आहे.
दरम्यान पंजाब किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. पंजाबने दोन्ही सामने जिंकले आहेत. पंजाबनंतर दिल्ली कॅपिट्ल्स दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबी तिसऱ्या, जीटी चौथ्या आणि केकेआर पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. तर चेन्नई आठव्या, राजस्थान नवव्या आणि हैदराबाद सर्वात शेवटी अर्थात दहाव्या स्थानी आहे.
लखनौची विजयासह सहाव्या स्थानी झेप
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप आणि आवेश खान.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेन्ट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चहर आणि विघ्नेश पुथूर.