रेल्वे जॉब 2025: रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) च्या पदांसाठी भरती करण्याची तयारी पूर्ण केली आहे. यावेळी एकूण 9900 पदांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे हजारो तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.
रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, अधिसूचना RRB च्या अधिकृत वेबसाइटवर देखील जारी केली जाईल. ही भरती अशा उमेदवारांना देखील संधी देईल जे 2024 च्या ALP भरतीमध्ये काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत किंवा CBT-1 मध्ये यशस्वी झाले नाहीत.
रेल्वेने यापूर्वी जाहीर केलेल्या ALP पदासाठी पात्रता 10 वी पास + ITI किंवा 10वी + 3 वर्षाचा संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा आहे. तर वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे होती (आरक्षित श्रेणींसाठी सूट). या वेळीही पात्रता पूर्वीसारखीच असेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, रेल्वेकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
दरम्यान, ज्या तरुणांना सरकारी नोकरीची इच्छा आहे किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. तब्बल 9900 पदांसाठी रेल्वेत भरती होणार आहे. त्यामुळं तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावाअसे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच रेल्वेतील भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळं पात्र उमेदवारांनी यासाठी तयारी करावी अशी माहिती रेल्वे बोर्डाने दिली आहे. लोको पायलट या पदांसाठी पात्रता ही 10 वी पास + ITI किंवा 10वी + 3 वर्षाचा संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा ही आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..