National Issues : देशाची वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारीची समस्या एक गंभीर आव्हान बनली आहे | वाचा सविस्तर
esakal April 06, 2025 04:45 AM

किल्लेमच्छिंद्रगड : देशातील वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारीची समस्या एक गंभीर आव्हान बनली आहे. देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे, ज्यामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. केवळ दोन वेळचे अन्न म्हणजे जीवन नाही, शिक्षण, आरोग्य, निवास व्यवस्था यासारख्या मूलभूत गरजा देखील जीवनासाठी महत्वपुर्ण आहेत.

वाढत्या बेरोजगारीमुळे कामगार वर्गाचे शोषण केले जात आहे. सर्वसाधारण प्रकरणांमध्ये रक्तरंजित संघर्ष घडत आहेत, वाढत्या अत्याचारामुळे अनुक्रमांची प्रकरणे वाढत आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थीतिशी मीडिया आणि सामान्य व्यक्तीने महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली पाहिजे. माध्यमांनी समाजातील समस्या अधोरेखित करण्यासाठी आणि सरकारला जबाबदार धरण्यासाठी कार्य केले पाहिजे. हे जितके गरजेचे आहे, तितकेच सामान्य माणसाने त्याच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी आणि समाजातील समस्या सोडविण्यात सक्रिय भूमिका बजावण्यास पुढे सरसावण्याची गरज निर्माण झाली आहे.

माध्यमांनी समाजातील समस्या अधोरेखित करण्यासाठी आणि सरकारला जबाबदार धरण्यासाठी कार्य केले पाहिजे. त्यांनी सरकारची धोरणे आणि कार्यक्रमांची चौकशी आणि टीका करणे. समाजातील समस्या हायलाइट करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी, सरकारवर दबाव आणण्यासाठी सामान्य माणसाचा आवाज बनून लोकशाहीचा स्तंभही टिकविला पाहिजे.

सामान्य माणसाने त्याच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी आणि समाजातील समस्या सोडविण्यात सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. त्यासाठी आपल्या हक्कांसाठी लढा देणे आणि सरकारकडून उत्तरे शोधणे. समाजातील समस्या सोडविण्यात सक्रिय सहभागी झाले पाहिजे. इतर लोकांना जागरूक करणे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढायला प्रवृत्त करणे ही सुद्धा भुमिका बजाविली पाहिजे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.