SRH vs GT : हैदराबादचे फलंदाज पुन्हा ढेर, पॅट कमिन्सच्या फिनिशिंग टचमुळे गुजरातसमोर 153 धावांचं आव्हान
GH News April 07, 2025 12:07 AM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात राजस्थान रॉयल्ससमोर 280 पार मजल मारल्यानंतर सनरायजर्स हैदराबादने 300 पार धडक देणार असल्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतर हैदराबादची दुरावस्था झाली आहे. हैदराबादचे फलंदाज सलग चौथ्या सामन्यात अपयशी ठरले आहेत. हैदराबादच्या प्रमुख फलंदाजांनी घरच्या मैदानात लोकल बॉय मोहम्मद सिराजसमोर गुडघे टेकले. मात्र अखेरच्या क्षणी कर्णधार पॅट कमिन्स याने केलेल्या खेळीमुळे हैदराबादला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचता आलं. हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. त्यामुळे आता हैदराबादला पराभवाच्या चौकारापासून वाचवण्याची सर्वस्व जबाबदारी ही गोलंदाजांवर असणार आहे. आता यात हैदराबाद यशस्वी ठरते की गुजरात विजयी होते? हे लवकरच स्पष्ट होईल.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, कामिंडू मेंडीस, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद शमी.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुधारसन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, राशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा इशांत शर्मा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.