चेहरा सुंदर आणि नितळ ठेवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वातआधी क्लीजिंग महत्वाचे असते. त्यासाठी आपण चेहरा साबणाने स्वच्छ धुतो. पण साबणामध्ये असलेल्या रासाय़निक घटकांमुळे त्वचा उजळत तर नाहीच उलट काळवंटते. मग अशावेळी चेहऱ्याच्या त्वचेची निगा कशी राखायची ते समजून घेऊया.
तज्ज्ञांच्या मते शरीराच्या इतर भागांपेक्षा चेहऱ्याची त्वचा पातळ व नाजूक असते. त्यामुळे साबणातील सल्फर हे त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकते.
चेहऱ्याला सतत साबण लावल्यास त्वचा कोरडी व निस्तेज होते. साबणात इतर रासायनिक घटकही असतात. त्यांचाही दुष्परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो.
चेहऱ्याची त्वचा खेचल्यासारखी दिसू लागते.
साबणात असलेल्या अॅसिड व इतर रासायनिक घटकांमुळे त्वचेचे कायमचे नुकसान होते.
क्लीन्सर
त्वचातज्त्रानुसार जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स एक्ने असतील तर तुम्ही साबणाऐवजी सैलिसिलिक अॅसिड बेस्ड फेस वॉश किंवा क्लींजरचा वापर करावा.
जर चेहऱ्यावर फक्त एक्ने असेल तर नियासिनमाइड बेस्ड क्लींजरचा वापर करावा.
तसेच जर पिंगमेंटेशन असेल तर ग्लायकोलिक अॅसिड बेस्ड क्लींजरने चेहरा स्वच्छ करावा.
जर चेहऱ्यावर काळे डाग असतील तर यावर ट्रैनेक्सौमिक अॅसिड बेस्ड क्लींजरचा वापर करावा.