सोन्याला झळाली! 48 तासात दरात दोन हजार रुपयांची वाढ, सोनं लाखाच्या उंबरठ्यावर, आजचा भाव किती?
Marathi April 17, 2025 01:39 PM

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="पुणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">पुणे : जागतिक व्यापारातील अस्थिरता, डॉलरचे अवमूल्यन, गुंतवणूकदारांकडून सोन्यात केली जाणारी गुंतवणूक, यामुळे 24 कॅरेट सोन्याच्या भावात गेल्या आठ दिवसांत 6 ते 7 हजार रुपयांनी वाढ झाली असून, 10 ग्रॅमचा दर जीएसटीशिवाय 95000 रुपयांवर गेला आहे. जीएसटीसह 97900 इतक्या विक्रमी उंचीवर दर जाऊन पोहोचले आहेत. तर, चांदीचा एक किलोचा दर पुन्हा एक लाखाच्या घरात पोहचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लागू केलेल्या 245 टक्के टॅरीफ दराच्यामुळे ही वाढ झाल्याचं सांगितले जात आहे. 

जीएसटीसह 97900 इतक्या विक्रमी उंचीवर

<एक शीर्षक ="जळगाव" href ="https://marathi.tezzbuzz.com/jalgaon" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत असून, गेल्या 48 तासात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये दोन हजार रुपयांची वाढ होऊन,  ते जीएसटीशिवाय दर 95000 हजार रुपये तर, जीएसटीसह 97900 इतक्या विक्रमी उंचीवर दर जाऊन पोहोचले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वर लागू केलेल्या 245 टक्के टॅरीफ दराच्या मुळे ही वाढ झाल्याचं सांगितले जात आहे.

अमेरिकेने 2 एप्रिलपासून भारतासह इतरही देशांवर जबर शुल्कवाढ लागू केली होती. भारतासाठी 26 टक्के शुल्कवाढ जाहीर केली तर इतर देशांनाही कमी अधिक प्रमाणात शुल्कवाढ केली आहे. त्यानंतर अमेरिकेने चीन वगळता इतर देशांवरील शुल्कवाढीला 90 दिवसांची स्थगिती दिली. मात्र, किमान 10 टक्के शुल्क कायम ठेवले आहे. याचा मोठा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर झाल्याचे दिसून आले. 

सोन्याचा 24 कॅरेटचा दर 8 एप्रिल रोजी 89,730 रुपये होता. सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणावर 22 करेटमध्ये बनवले जातात. या सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 82 हजार 250 रुपये होता. त्यानंतर 12 एप्रिल रोजी 24vकॅरेटचा भाव वाढून 95,670 आणि 22 कॅरेटचा भाव 87,700 रुपयांवर गेला. बुधवारी (दि. 16) एका दिवसात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 990 रुपयांनी वाढून 96,170 रुपयांवर गेला. तर, 22 कॅरेटचा भाव 950 रुपयांनी वाढून 88,150 रुपयांवर पोहचला. सोने आणि चांदीवर तीन टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जातो. त्याप्रमाणात सोने आणखी महागते. त्यानुसार 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 90,700 ते 99 हजार रुपये असा होता.

शुल्कवाढीचं संकट तूर्तास पुढे ढकलले आहे. मात्र, अमेरिका आणि चीन या दोन आर्थिक महासत्ता समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनिश्चितता वाढली आहे. परिणामी, विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांसह गुंतवणूकदारांनी सोने खरेदी वाढविली आहे. त्यातच डॉलरचे अवमूल्यन झाल्याने सोन्याच्या भाववाढ होताना दिसत आहे.

अमेरिका-चीन टॅरिफ वॉरचा फटका

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफ वॉरचा फटका हा जगाला बसत असून त्यामुळेच सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर मोठा आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सोन्याच्या किमतीमध्ये काहीशी घट होऊन ती 87 हजारांच्या जवळपास गेली होती. पण नंतर चीन वगळता इतर सर्वच देशांवरील आयातकर हा 10 टक्क्यांवर करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी केला. पण हा कालावधी फक्त 90 दिवसांपुरता आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतील याचा अंदाज लावता येत नाही. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.