सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड कारागृहात आहे.. मात्र तुरुंगातही कराडच्या दहशतीची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही... त्यातच आता तुरुंगात झालेल्या मारहाणीनंतर वाल्मिक कराडने आतमध्ये आहात म्हणून वाचलात, नाहीतर संतोष देशमुखांपेक्षा जास्त हाल करुन मारलं असतं. अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेंनी केलाय...
वाल्मिक कराड गँगने सरपंच संतोष देशमुखांची अत्यंत निघृणपणे हत्या केली. या प्रकरणी कराड बीड कारागृहात आहे.. मात्र बीड कारागृहात महादेव गित्ते गँग आणि कराड गँगमधील टोळीयुद्ध समोर आलं. त्यानंतर महादेव गित्ते आणि त्याच्या साथीदारांना संभाजीनगर जिल्ह्यातील हरसूल कारागृहात हलवण्यात आलं.
मात्र महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्तेंनी थेट कारागृह प्रशासनावर हल्लाबोल करत सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केलीय...त्यामुळे कारागृहातील सीसीटीव्हीमुळे वाल्मिक कराड आणि तुरुंग प्रशासनाचा भांडाफोड होणार का? याकडे लक्ष लागलंय...