राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानाचे सांगलीत संतप्त पडसाद उमटले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषिमंत्री कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन करत मंत्री कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा दहन करण्यात आले आहे,यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मंत्री कोकाटे यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणून सत्तेवर आलेले सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे उद्योग करत असल्याचा आरोप करत शेतकरी कर्ज माफीसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी यावेळी दिला आहे.
Pune News: ५ मे पर्यंत पुणे शहरात ड्रोन उडवण्यास बंदीपुणे शहर पोलिसांच्या वतीने आदेश जारी
आजपासून ५ मे पर्यंत आदेश राहणार जारी
ड्रोन सह रिमोट कंट्रोल लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लिडिंग, हॉट एयर बलून याच्या वापरावर सुद्धा प्रतिबंधात्मक आदेश लागू
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार
Alibaug: अलिबाग रेवस मार्गावरील वाहतूक ठप्प० भाल गाव हद्दीत मोठा वृक्ष उन्मळून भर रस्त्यात कोसळून पडला
० रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा
० अलिबागकडे येणारी वाहतूक कनकेश्वर फाट्यावरून वळवली
धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा वाढला 42.5°c इतक्या तापमानाची करण्यात आली नोंदधुळ्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून आज धुळ्यात 42.5°c इतक्या उचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे,
यंदाच्या हंगामातील हे सर्वात उच्चांकित तापमान मानलं जात असून, यामुळे अक्षरशः रस्त्यांवर शुकशुकाट बघावयास मिळत आहे,
दोन दिवस अधून मधून पडलेल्या अवकाळी पावसानंतर आता धुळ्याच्या तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे, धुळेकरांना प्रचंड वाढलेल्या उन्हाच्या झळा आता सोसावा लागत आहेत,
तापमानाचा पारा प्रचंड वाढल्यामुळे धुळेकर नागरिक घराबाहेर नपडनच पसंत करत आहेत, त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे,
यापुढे देखील तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
डोंबिवलीत शेयर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडादुप्पट तिप्पट दहापट परताव्याचे आम्हीच दाखवून गुंतवणूकदारांची कोठे व त्यांचे फसवणूक झाल्याच्या घटना या आधी देखील उजेडात आल्यात .टोरेस घोटाळा ताजा असतानाच डोंबिवलीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 'शेअर मार्केट'मध्ये मोठा परतावा देतो म्हणत 'ग्रोथअप इंडिया' आणि 'अर्थयुक्ती कन्सल्टिंग'च्या नावाखाली तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे .अनिकेत मुजुमदार, संदेश जोशी आणि संकेत जोशी अशी तिघांची नावे आहेत .
हरवलेली मुलगी अवघ्या २ तासांत मिळाली! पुणे पोलिसांची कार्यतत्परतापुण्यातील शेळके वस्तीतून हरवलेली ८ वर्षांची चिमुरडी पुणे पोलिसांनी शोधली अवघ्या २ तासात
पुण्यातील शेळके वस्तीतून नातेवाईकांच्या घरून ८ वर्षांची मुलगी झाली होती बेपत्ता
मुलगी हरवलेल्या परिसरातील सर्व CCTV तपासात बिबवेवाडी पोलिसांनी घेतला मुलीचा शोध
अवघ्या दोन तासात चिमुकली केली तिच्या पालकांना स्वाधीन
दिव्या कमलाकर मासाळे असं बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव
मुलीच्या वडिलांनी दिली होती मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद
पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे बेपत्ता झालेली मुलगी वेळेत सापडली
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेस धुळ्यात शिवसेनेतर्फे जोडेमारो आंदोलनकृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना दिसून आले आहेत, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याविरोधात धुळ्यात ठाकरे गट शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसून आले असून, या ठिकाणी झाशी राणी पुतळा परिसरामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेस जोडे मारून शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे,
जालन्यातील अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी गावामध्ये श्रीरामनवमीचा उत्सवराज्यभरामध्ये श्रीराम नवमीचा उत्सव पहायला मिळत आहे. जालन्यातील धनगर पिंपरी या गावामध्ये देखील श्रीरामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल आहे. राम नवमी निमित्त गावातून पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. धनगर पिंपरी गावामध्ये दिवाळी सणाप्रमाणेच सासरी गेलेल्या मुली श्रीराम नवमी उत्सवासाठी गावामध्ये परत येतात.श्रीरामजन्माच्या दिवशी संपूर्ण गावात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सामूहिक पूजन, भजन, कीर्तन, रामजन्मोत्सवाने वातावरण पवित्र होऊन जातं.गावात शेकडो वर्षांपूर्वी बांधलेलं श्रीराम आणि हनुमानाचे भव्य मंदिर या श्रद्धेचं केंद्रबिंदू आहे . त्याचबरोबर गावामध्ये शेकडो वर्षापूर्वीच श्रीराम मंदिर आणि हनुमंताचे मंदिर आहे. दरम्यान या गावामध्ये 1212 मध्ये स्थापन केलेली हनुमानाची प्राचीन मूर्ती आहे. जेव्हा गावकऱ्यांनी हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तेव्हा हनुमानाच्या मूर्तीवर तब्बल साडेतीन ते चार क्विंटल शेंदूर निघल्याच गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
Maharashtra News Live Updates: रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा, ठाकरेंचा भाजपला टोला उद्धव ठाकरेरामाचे नाव घेण्याची भाजपची पात्रता नाही. रामासारखे वागण्याचा प्रयत्न करा. Dhule: रामनवमीनिमित्त धुळ्यात राम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दीरामनवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा होत आहे, धुळ्यात देखील रामनवमीनिमित्त शहरातील फुलवाला चौक परिसरातील भगवान श्रीराम यांच्या प्राचीन मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रीग लागलेली बघावयास मिळत आहे,
भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करताना दिसून येत असून, आज रामनवमीनिमित्त राम मंदिर प्रशासनातर्फे राम मंदिराची विशेष अशी सजावट देखील करण्यात आली असून, या ठिकाणी विद्युत रोषणाईसह फुलांची आरास देखील बघावयास मिळत आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आलासंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात रामनवमीचा उत्सव अत्यंत भक्तीभावात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
रामजन्माच्या दिवशी मंदिरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
यावेळी समाधी मंदिरात विशेष राम जन्मोत्सव पूजा आणि अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते.
रामजन्मानंतर ‘जय श्रीराम’ च्या गजरात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने राम जन्मसोहळा अनुभवला.
उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती आणि राम जन्मावेळी माऊलींच्या समाधीस्थळी भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली.
यवतमाळात शिवसेना ठाकरे गट आक्रमक, कृषी मंत्र्यांविरोधात ठाकरे गट आक्रमकशेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आणि अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर करित यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचा पाहायला मिळाले असून भर चौकात कृषी मंत्र्याचा पुतळा फासावर लटकवून जोरदार आंदोलन करण्यात आला.आंदोलकांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतापलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मंत्री कोकाटेंचा पुतळा फासावर लटकावून निषेध नोंदवण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे आणि शिवसैनिक आक्रमक झाले होते.मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.शेतकऱ्यांबदल जर कुणी अशोभनीय वक्तव्य करत असेल, तर त्याला मंत्रिपदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही. कोकाटेंचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी ठाकरे गटाने लावून धरली.
बदलत्या हवामान आणि एकवीरा देवीच्या उत्सवामुळे मोठ्या प्रमाणात मासेमारी बोटी किनाऱ्यावरराज्यात सर्वत्र अवकाळीची हजेरी, यामुळे वातावरणात झालेले बदल आणि हावामान खात्याकडून देण्यात आलेला यलो अलर्ट तसचे कोळी बांधवांचे आराध्य दैवत एकवीरा देवीचा सद्या सुरु असलेला उत्सव यामुळे रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार बोटी बंदरात लागलेल्या दिसत आहेत. हावामान खात्याकडून 9 एप्रिल पर्यंत हा यलो अलर्ट दिला असून वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात थोड्याच वेळात मोठ्या उत्साहात पार पडणार रामजन्म सोहळा- पुजारी, विविध मान्यवर आणि भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी केली जाणार
- श्री राम जन्म सोहळ्यासाठी मंदिर परिसरात हजारो भाविक दाखल
- आज दिवसभरात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत, छगन भुजबळ घेणार काळारामाचे दर्शन
- 12 वाजेला होणार राम जन्मोत्सव
Pune Accident: पुण्यात टँकर खाली येऊन दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यूटँकर रिव्हर्स घेताना चालकाचे लक्ष नसल्याने घडला अपघात
पुण्यातील वारजे परिसरातील घटना
टँकरच्या मागच्या चाकाखाली येऊन दोन वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू
वारजे पोलीस स्टेशनमध्ये चालकाविरोधात गुन्हा दाखल
टँकर चालकाला पोलिसांनी केली अटक
वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणपती माथा परिसरात काल रात्री घडली घटना
टँकर चालकावर वारजे पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Nashik: नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिरात श्रीराम जन्म उत्सवाला सुरवात12 वाजता पाळणा हलवून श्री रामाचा जन्म उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
एपीएमसी फळबाजारात राज्यासह परराज्यातून आंब्याची मोठी आवक, 80 हजार पेक्षा अधिक पेट्या दाखलफळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याची आवक एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर होण्यास सुरुवात झालेय.
एपीएमसी फळ बाजारात राज्यभरातून 64184 आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या असून परराज्यातून 16740 आंब्याच्या पेट्या दाखल झाल्यात.
एकूण 80 हजाराच्या वर आंब्याच्या पेट्या या एपीएमसी फळ बाजारात दाखल झाल्याने आंब्याचा दर 1200 रुपये ते 5000 रुपये प्रति पेटी इतका घसरलेला पहायला मिळत असून आंबा आता सर्वासामान्य ग्राहकांना परवडेल या भावात मिळू लागलाय.
10 मे पर्यंत आंब्याचा हंगाम अशाच प्रकारे सुरू राहणार असून आंबे खवय्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल.
रामनवमी निमित्ताने नवापूर शहरातून निघाली महिलांची मोटरसायकल रॅलीरामनवमी निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरातून महिलांनी मोटार सायकल रॅली काढत रामनवमीचा पर्व उत्साहात साजरी केला आहे.
नवापूर शहरातील दत्त मंदीरापासून यामहिलांच्या बाईक रॅलीला सुरवात झाली होती.
शिवाजी रोड, लिमंडावाडीस, लाईटबाजारातून श्रीराम मंदीरात या बाईक रॅलीची सांगता करण्यात आली.
मोटार सायकल रँलीमध्ये महिला भगवा फेटा बाधुन जयश्रीरामचा जयघोष करत मोटार सायकल रँली मध्ये मोठया उत्सहात सहभागी झाल्या होत्या.
या नंतर महिलानी श्रीराम मंदीरा जवळ गरबा नृत्यृ सादर करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या रायगडावरील अन्नत्याग आंदोलनाला अखेर यशआंदोलनातील मुद्दे निकाली काढण्यासाठी उद्या दुपारी बारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली बैठक.....
दिव्यांग व शेतकरी शेतमजुरांच्या विविध प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी रायगडावर केले होते अन्न त्या आंदोलन....
यामध्ये दिव्यांगाना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे,दिव्यांगांची कर्जमाफी करावी, पेरणी ते कापणी पर्यंतची कामे MREGS अंतर्गत करण्यात यावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, यासह अनेक मागण्या बच्चू कडूंनी सरकारकडे केल्या होत्या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक लावून तुमचे मुद्दे निकाली काढू असे दूरध्वनीवरून दिले होते आश्वासन, त्यानंतर बच्चू कडू यांनी आपले उपोषण घेतले होते मागे....
सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीसाठी सर्व विभागातील सचिव राहणार उपस्थित.....
Latur: लातूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळलालातूरचा निलंगा तालुक्यातील मसलगा गावात संतप्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचं दहन केल आहे...
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा निषेधार्थ शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे..
यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत ,पुतळ्याचे दहन केलं आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोहरादेवी दौऱ्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यातशेतकरी कर्जमाफी आणि पीकविम्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचं राजू शेट्टी यांनी केलं होतं शेतकऱ्यांना आवाहन.
स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाशिम पोलिसांनी घेतले ताब्यात.
पोलिसांकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना कालच बजावली होती नोटीस.
पोलिसांकडू दडपशाही केली जात असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप.
जून नंतर सार्वजनिक बांधकाम विभागात कामांचा पाऊस पडेल; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मुश्किल टिप्पणीयंदाच्या अर्थ संकल्पात फारसं काही घेता आलं नाही पण जून नंतर रस्ते,पूल अशा कामांचा पाऊस पडेल, अशी मिश्किल टिप्पणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
मंत्री भोसले हे काल पंढरपुरात एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.
लाडकी बहिण योजनेमुळे सरकारने अनेक विकास कामांना कात्री लावली आहे. त्याचा फटका सार्वजनिक बांधकाम विभगागाला ही बसल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष सांगितले.
अनेकांना वाटते आपला मित्र सार्वजनिक बांधकाम मंत्री झाला आहे. काम मिळतील पण यावर्षी फारसं काही मिळालं नाही. जून नंतर मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यात सर्वत्र कामांचा पाऊस पडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
Karjat: कर्जत येथे राम मुर्तीच होणार लोकार्पण० कर्जत येथील दहिवली गणेश घाट येथे भव्य अशी राम मुर्ती उभारण्यात आली आहे
० सकाळपासून या ठिकाणी विधीवत पुजा, होम हवन सुरू झाले आहे
० संध्याकाळी भव्य अशा सोहळ्यात राम मुर्तीच होणार लोकार्पण
० आ. महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, 1008 मंडलेश्वर महामहंत चंद्रदेवासजी महाराज हे उपस्थित रहाणार आहेत
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीत विविध विकास कामांची पाहणीराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली आहे.
आज सकाळपासूनच अजित पवारांनी शहरात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांना भेटी दिल्या आहेत आणि ही विकास कामे दर्जेदार व्हावीत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
भुम तालुक्यातील वंजारवाडी येथे विज वितरणच्या डीपीचा करंट लागुन युवकाचा मृत्यूधाराशिव च्या भुम तालुक्यातील वंजारवाडी येथे विद्युत वितरण कंपनीच्या डिपीचा करंट लागुन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बालाजी भालचंद्र जगदाळे अस या युवकाच नाव असुन तो लाईनमन च्या हाताखाली काम करायचा.
सदरील युवक डिपीची दुरुस्ती करण्यासाठी गेला असता लाईट बंद न केल्याने करंट लागुन मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय
तर याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मृतदेह भुम महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठेवण्यात आला होता दरम्यान याबाबत चौकशी करुन कारवाई करु असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेवुन व अंत्यसंस्कार करण्यात आले.
Nanded: रामनवमीनिमित्त नांदेड शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात.रामनवमीनिमित्त नांदेड शहरात भव्य मिरवणूक निघणार आहे.
श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या दरम्यान शहरात या मार्गावर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलीस दलाने घेतली आहे.
शहरात पोलिसांचा मोठा फौफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, 31 पोलीस निरीक्षकांसह 1200 पोलीस कर्मचारी तसेच 1100 होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्यासह मोठा पोलीस बंदोबस्त नांदेड शहरात लावण्यात आला आहे.
सकाळ पासूनच शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्ता सोबतच इतरही उपाय योजना करण्यात आल्या आहेत
Maharashtra Live Updates: विश्रांतवाडीमध्ये काँग्रेसचे भिक मांगो आंदोलनदीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय, हलगर्जीपणाची, उन्मादातून घडलेली असल्याचे स्पष्टपणे दिसते.
या रुग्णालयाला धर्मादाय हेतूसाठी केवळ एक रुपयाच्या दराने मिळालेली जमीन, त्या बदल्यात नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा काय? हा प्रश्न आता सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा आणि हक्काचा आहे.
काँग्रेसच्या वतीने विश्रांतवाडी येथे भिक मांगो आंदोलन करण्यात आले आणि खालील मागण्या शासनाकडे मांडण्यात आल्या धर्मादाय आयुक्तांनी तातडीने तपासणी करून अहवाल सादर करावा चौकशी पूर्ण होईपर्यंत रुग्णालयाची जबाबदारी शासनाने तात्पुरती आपल्या अखत्यारीत घ्यावी अशी मागणी करण्यात आली.
Dharashiv: धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढतधाराशिव जिल्ह्यात आज जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनचे मतदान काल पार पडले. जिल्ह्यात एकूण आठ मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडली असून आहे.
मजूर फॅडरेशनचे जिल्ह्यात एकूण 343 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.
आज याचा निकाल लागणार असून मजूर फेडरेशनवर महाविकास आघाडी की महायुती याचा फैसला होणार आहे.
13 पैकी चार जागा या यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून बाकी नऊ जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात आहेत.
भाजपा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच वर्चस्व या मजूर फेडरेशन वरती राहीलेले आहे.
Nanded: नांदेड जिल्ह्यातील विहिरींचे होणार सर्वेक्षण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काढले आदेशनांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथील घटनेनंतर कठडे नसलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेनंतर जिल्ह्यात दुसरी घटना घडू नये यासाठी आपत्कालीन उपाय योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व धोकादायक तसेच कठले नसलेल्या विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
यात प्रामुख्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींच्या नोंदी घेऊन अहवाल सादर करावेत अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
आलेगावच्या घटनेमध्ये सात निष्पाप शेत मजूर महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला.
त्यामुळे अशा धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकारी कर्डिले यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्याआहेत.
उमरगा येथील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या प्रसिद्ध बालाजी देवस्थानाच्या यात्रेला सुरुवातधाराशिवच्या उमरगा शहरातील मुळज रोड लगतच्या बालाजी मंदिर देवस्थानच्या याञेला शनिवार पासुन प्रारंभ झालाय दरम्यान याञेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात.शहरातील प्रमुख मार्गावरून पालखीची मिरवणूक काढण्यात आली.शहरातील जुनीपेठ,महादेव मंदिर,गणपती मंदिरापासून महामार्गावरून ढोल,बँजो हलगी व डॉल्बीच्या तालावर नागरिकांनी जल्लोष केला.मिरवणुकीनंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते.
Nashik: रामनवमी निमित्त श्री काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दीनाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी रामनवमी निमित्ताने दर्शनासाठी गर्दी केली आहे पहाटे झालेल्या काकडा आरती नंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे... आज बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळा काळाराम मंदिरात पार पडणार असून यापूर्वी प्रभू श्रीरामा सह सीतामाता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचे अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून अभूषणा चढवली जात आहेत..
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचा आत्महत्येचा प्रयत्नलातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे..
रात्री त्यांच्या लातूर येथील शासकीय निवासस्थानी रिवाल्वर मधून स्वतःवरती गोळी झाडून घेतली आहे..
तर यात आयुक्त बाबासाहेब मनोहरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत, सध्या त्यांच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...
दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे..
मात्र आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही
तुळजाभवानी मंदीराचे महाद्वार ११ एप्रिल रोजी पहाटे भाविकांसाठी होणार बंदतुळजाभवानी मातेच्या चैञ याञेच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी पहाटे तुळजाभवानी मंदीराचे महाद्वार भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे.
याञा कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्यांवरुन मंदीरात सोडण्यात येणार आहे.
दरम्यान १२ एप्रिल रोजी मंदीरात पोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.तुळजाभवानी मातेची चैत्र पोर्णिमा याञा ११ ते १५ एप्रिल दरम्यान साजरी करण्यात येणार आहे.
याञेत राज्यासह आंध्र प्रदेश,कर्नाटक व तेलंगनातील भाविक वर्षाचा खेटा पुर्ण करण्यासाठी येतात याञा कालावधीत भाविकांना सुलभ दर्शनासाठी ११ ते १५ एप्रिल दरम्यान बिडकर पायऱ्यांवरुन मंदीरात सोडण्यात येणार आहे अशी माहिती मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्यमंत्री योगेश यांनी ताफा थांबवून अपघात ग्रस्त व्यक्तीची केली मदतगृहराज्यमंत्री खेड दापोली महामार्ग ने जात असताना रोड च्या कडेवर गंभीर जखमी झालेल्या अज्ञात व्यक्तीला बघून नामदार योगेश कदम यांनी आपला ताफा थांबवला व घटनेची माहिती घेतली माहिती घेता च गंभीर जखमी असलेल्या अज्ञात व्यक्तीला लगेच मदत करत आपल्या गाडीमधून रुग्णालयात दाखल केले.. गावकऱ्यांकडून माहिती घेता अपघात झाल्या चे समोर आले या अपघातात अमरनाथ दयाळकर हा गंभीर झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत
सकाळ मध्यम समूह व साम टीव्हीच्या वतीने अमरावतीमध्ये गीत रामायण, हजारो श्रोत्यांची उपस्थितीआज रामनवमी, सकाळ मध्यम समूह व साम टीव्हीच्या वतिने अमरावती मध्ये पहाटे रामनवमी निमित्य गीतरामायनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाकवी माडगूळकर विरचित गीतरामायण यावेळी सादर करण्यात आले.
यावेळी खासदार बळवंत वानखडे,आ.सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस विधांन परिषदेचे आमदार संजय खोडके, यांच्या सह अमरावती शहरातील हजारो श्रोत्यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी गीत रामायणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.हे सकाळ मध्यम समूह तर्फे आयोजित गीत रामायणाचे हे 17 वे वर्ष आहे.
पेडगाव येथील धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची मागणीअहिल्या नगर येथील पेडगाव येथील धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभा करावे व अखंड ज्योत प्रज्वलित करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर व सुनील नागणे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. सरकार या बाबत सकारात्मक विचार करेल असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले आहे.
दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त.अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल वाहन चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या..
चोरीच्या 3 मोटार सायकली आणि 2 मालवाहू वाहने असा एकत्रित 7 लाख 45 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केलाय..
शेख ईरशाद शेख आजम याने अकोला जिल्ह्यात आणि ईतर ठीकाणी मोटार सायकली आणि मालवाहु गाडीची चोरी केली होती..
या माहीती वरून पथकाने त्याच्या साथीदारासह त्याला ताब्यात घेतले..
दोघांनी दुचाकी व चारचाकी मालवाहू वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली असून त्याचे हा चोरीचा मुद्देमाल जप्त केलाय..
बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर, जुने शहर आणि कारंजा लाड मधून या दोघांनी हे सर्व दुचाकी आणि वाहने चोरी केले होते..
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचा आत्महत्येचा प्रयत्नलातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे..
रात्री त्यांच्या लातूर येथील शासकीय निवासस्थानी रिवाल्वर मधून स्वतःवरती गोळी झाडून घेतली आहे.. तर यात आयुक्त बाबासाहेब मनोहरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत, सध्या त्यांच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...
दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे..
मात्र आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही....
सांगोल्याच्या किडे बिसरीच्या शाळेत मुलींच्या शौचालयाची दुरावस्थासोलापूर आणि सांगली जिल्हाच्या सरहद्दीवर असलेल्या सांगोला तालुक्यातील किडेबिसरी येथील एका माध्यमिक शाळेत मुलींच्या शौचालयाची दुरावस्था झाली आहे.
त्यामुळे शाळेतील मुलींची कुचंबणा होत आहे असा आरोप स्थानिक पालकांनी केला आहे.
येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात पाचवी ते दहावी पर्यंत शाळा भरते.
शाळेच्या मालकीची इमारत नाही. भाड्याच्या जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतीमध्ये शाळा भरवली जाते. शाळेला क्रीडांगण नाही.
शाळेत सीसीटीव्ही बसवले नाहीत. शौचालयाची दुरावस्था झाली आहे. मुख्याध्यपकाचे कार्यालही एका धाब्याच्या घरात सुरू आहे.
मुलींसाठी शाळेच्या आवारात चांगले शौचालय आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अन्यथा शाळा व्यवस्थापना विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पालक व ग्रामस्थांनी दिला आहे.
Ambernath: अंबरनाथमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलंअंबरनाथमधील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांचं अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी कार्यालय आहे.
या कार्यालयात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले १० ते १२ हल्लेखोर आले.
त्यांनी ऑफिसच्या काचा तलवारीने फोडत ऑफिसमध्ये घुसून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणावर देखील तलवारीने हल्ला चढवला.
तसंच ऑफिसमधील खुर्च्यांचीही तलवारीने वार करत नासधूस केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.
अवघ्या २३ सेकंदात हल्ला चढवून हे हल्लेखोर तिथून पसार झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.