आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना पार पडला. हा सामना पंजाब किंग्सने 18 धावांनी हा सामना जिंकला. पंजाब किंग्सचा या स्पर्धेतील तिसरा विजय आहे. या विजयासह पंजाब किंग्सने टॉप 4 मध्ये जागा मिळवली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सची सुरुवात काही चांगली झाली नाही. प्रभसिमरन सिंग खातंही न खोलता बाद झाला. त्यानंतर एकेरी धावा करत तंबूत परतण्याची शर्यत लागली. श्रेयस अय्यर 9, मार्कस स्टोयनिस 4, नेहल वढेरा 9 ग्लेन मॅक्सवेल 1 धाव करून बाद झाला. पण एका बाजूने प्रियांश आर्यने झंझावाती खेळी केली. त्याने 42 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकार मारत 103 धावांची खेळी केली. तर तळाशी असलेल्या शशांक सिंग आणि मार्को यानसेने जबरदस्त खेळी केली. शशांकने नाबाद 52 आणि मार्को यानसेनने नाबाद 34 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 219 धावा केल्या आणि विजयासाठी 220 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात सावध झाली. पण आक्रमक खेळी करण्यात अपयशी ठरले.
रचिन रवींद्र आणि डेवॉन कॉनवेने पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. रचिन रवींद्र 36 धावांवर असताना स्टंपिंग झाला. त्यानंतर आलेला कर्णधार ऋतुराज गायकवाड काही खास करू शकला नाही. फक्त एक धाव करून बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे आणि कॉनवेची जोडी जमली. पण वेगाने धावा काही करता आल्या नाहीत. त्यामुळे धावा आणि चेंडूंचं अंतर वाढलं. शिवम दुबे 27 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी आला. तर डेवॉन कॉनवेचा स्ट्राईक रेट पाहता शेवटच्या षटकापूर्वी त्याला रिटायर्ट आऊट केलं. त्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात आला. महेंद्रसिंह धोनी 12 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकार मारत 27 धावा करून बाद झाला. चेन्नई सुपर किंग्स 20 षटकात फक्त 201 धावा करून शकला आणि 18 धावांनी पराभव झाला.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पाथिराना