श्रीनेस्ट बोर्ड सरेन बोर्डाला जारी केले जाते
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेली अमरनाथ यात्रा यंदा 25 जुलैला सुरू होऊन 19 ऑगस्ट 2025 पर्यंत चालेल. यावेळी यात्रेत सामील होण्यासाठी नोंदणी 14 एप्रिलपासून सुरू झाली असून भाविकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यावर्षी यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. भाविक ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करू शकतात. अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन नोंदणी करता येते. अमरनाथ यात्रा कठीण पर्वतीय ट्रेकिंगशी संबंधित असल्यामुळे बोर्डाने काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दररोज फक्त 15,000 भाविकांना परवानगी असेल. तसेच आरोग्य प्रमाणपत्र आणि वयाचे निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे.