Famous neurosurgeon Dr. Shirish Valsangkar commits suicide in Solapur
Marathi April 19, 2025 12:40 PM


सोलापुरातील पहिले मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांचे रामवाडी परिसरात मोठे हॉस्पिटल आहे. आपल्या 40 वर्षाच्या वैद्यकीय सेवेत त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.

(Dr. Valsangkar suicide) सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काल, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास आत्महत्या केली. 70 वर्षीय डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून जीवन संपवल्याने सोलापुरात खळबळ उडाली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि मुलगी असा परिवार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तेलंगणामध्ये त्यांची ख्याती होती.

सोलापुरातील पहिले मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांचे रामवाडी परिसरात मोठे हॉस्पिटल आहे. आपल्या 40 वर्षाच्या वैद्यकीय सेवेत त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. मोदी परिसरातील सोनमाता शाळेजवळील आपल्या निवासस्थानी डॉ. वळसंगकर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबीयांसमवेत जेवण करीत होते. सुमारे साडेआठ वाजता ते उठून बाथरूममध्ये गेले आणि त्यानंतर त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून स्वत:च्या डोक्यात दोन राऊंड फायर केल्या. गोळी झाडल्याचा आवाज येताच, सर्व कुटुंबीयांनी तिथे धाव घेतली. तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले आढळले. त्यानतंर कुटुंबीयांनी त्याना वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

हेही वाचा – Hindi Language Controversy : मुलांनी काय शिकावं हे राज ठाकरे कसं काय ठरवणार? बच्चू कडूंचा सवाल

डॉ. वळसंगकर यांचे मुलगा अश्विन हेही डॉक्टर असून त्यांनी प्राथमिक उपचार केले, पण साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज, शनिवारी त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम होणार आहे. डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येचे वृत्त सोलापुरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे शहरातील मान्यवर, त्यांचे रुग्ण यांच्यासह अनेक नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. तथापि, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याबाबतच्या सर्व शक्यता पडताळून पाहात आहेत.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूरमधील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायंसमध्ये शिक्षण घेतले. विज्ञान विषयात प्री-डिग्री ऑनर्स आणि प्री-प्रोफेशनल ऑनर्ससह उत्तीर्ण झाले. डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी शिवाजी विद्यापीठ तसेच लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदव्या प्राप्त केल्या. त्यांचे मराठी आणि इंग्रजीबरोबरच कन्नड आणि हिंदी या भाषांवर प्रभूत्व होते. डॉ. शिरीष वळसंगकर यांचे पुत्र डॉ. अश्विन आणि सून डॉ. सोनाली हे दोघेही न्युरोलॉजिस्ट आहेत.

हेही वाचा – Bhagwad Gita : भगवद् गीता, नाट्यशास्त्राचे महत्त्व युनेस्कोला कळले, मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.