While clarifying Babasaheb Patil’s statement Dhananjay Munde said that he has Bell’s Palsy
Marathi April 19, 2025 12:40 PM


धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यांना नीट बोलताही येत नाही, असे वक्तव्य बाबासाहेब पाटील यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी त्यांना झालेल्या आजाराबाबत माहिती दिली आहे.

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे हे गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर धनंजय मुंडे हे आजारपणामुळे राजकारणापासून दूर राहत असल्याचे चित्र आहे. मात्र आज (18 एप्रिल) नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना आमदार सुरेश धस यांच्यासोबतच्या कार्यक्रमाला माजी मंत्री धंनजय मुंडे गैरहजर राहिल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यांना नीट बोलताही येत नाही. बाबासाहेब पाटील यांच्या या वक्तव्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी त्यांना झालेल्या आजाराबाबत माहिती दिली आहे. (While clarifying Babasaheb Patil’s statement Dhananjay Munde said that he has Bell’s Palsy)

धनंयज मुंडे यांनी ट्वीट करताना म्हटले की, आमचे सहकारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला आहे. या आजाराचा परिणाम माझ्या चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो. बाबासाहेब पाटील यांची आणि माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार. मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे. या आजाराचा आणि इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास मला अजूनही हो आहे. त्यामुळे मला बोलायला त्रास होतो. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले.

हेही वाचा – Hindi Language Controversy : आदित्य ठाकरेंनी सांगितलं भेटीगाठीचं ‘राज’कारण

 

काय म्हणाल होते बाबासाहेब पाटील?

नांदेडमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना धनंजय मुंडेंबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, त्यांची तब्येत ठीक नाही. मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला असून त्यांचे डोळे देखील वाकडे झाले आहेत. त्यांना बोलताही येत नाही. परंतु ते आमच्या बैठकीला मुंबईत येतात आणि काही कार्यक्रमांनाही हजेरी लावतात. जवळच्या व्यक्तींना आग्रह केल्यानंतरही ते कार्यक्रमांना जातात, असे वक्तव्य बाबासाहेब पाटील यांनी केले होते.

हेही वाचा – Maratha Reservation : आयोगाच्या अध्यक्षांकडून शेकडो कोटींचा भ्रष्टाचार; सुषमा अंधारेंचा आरोप





Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.