आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर रजत पाटीदार याच्या खांद्यावर आरसीबीच्या कर्णधारपदाची धुरा आहे. मुंबईचा हा एकूण पाचवा तर घरच्या मैदानातील दुसरा सामना असणार आहे. तर आरसीबीचा हा चौथा सामना असणार आहे. मुंबईला 4 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. त्यामुळे मुंबईसमोर आरसीबीविरुद्ध घरच्या मैदानात दुसरा विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना मंगळवारी 7 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहता येईल.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा.