IPL 2025 Points Table : पंजाबने पहिल्या पराभवासह सिंहासन गमावलं, आता नंबर 1 कोण?
GH News April 06, 2025 08:07 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात शनिवारी 5 एप्रिलला डबल हेडरचा थरार रंगला. या डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. पंजाब किंग्स सलग 2 विजयांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी होती. मात्र दिल्लीने शनिवारी चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आणि पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे पंजाबची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. मात्र पंजाब किंग्सला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून पुन्हा पहिलं स्थान काबिज करण्याची संधी होती. मात्र राजस्थानने पंजाबवर मात करत अप्रत्यक्ष दिल्लीला नंबर 1 राहण्यात सहकार्य केलं. तर पंजाबला या मोसमातील पहिल्याच पराभवासह मोठा फटकाही हसला आहे.

पंजाबला पहिलं स्थान गमवावं लागलं. तसेच पंजाबची पॉइंट्स टेबमध्ये थेट चौथ्या स्थानी घसरण झाली. राजस्थानने पंजाबवर 50 धावांच्या मोठ्या फरकाने मात केली. त्यामुळे पंजाबला हा तोटा सहन करावा लागलाय. पंजाबचा नेट रनरेट हा 0.074 असा आहे. तर दिल्लीचा नेट रनरेट हा सलग 3 विजयानंतर +1.527 असा आहे.

पंजाबच्या पराभवाने आरसीबीला फायदा

पंजाबच्या पराभवामुळे आरसीबीला फायदा झालाय आहे. पंजाबची चौथ्या स्थानी घसरण झाल्याने आरसीबी दुसऱ्या स्थानी पोहचली आहे. तर गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानी आहे. गुजरातने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तसेच आरसीबीने 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. पाचव्या स्थानी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आहे. केकेआरने 4 पैकी 2 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर तितकेच गमावले आहेत.

दिल्ली नंबर 1

राजस्थान सातव्या स्थानी

राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सवर 50 धावांच्या मोठ्या फरकाने मात करत महत्त्वपूर्ण 2 पॉइंट्स मिळवले. राजस्थानचा हा 4 सामन्यांतील दुसरा विजय ठरला. राजस्थान यासह सातव्या स्थानी पोहचली. राजस्थानचा नेट रनरेट हा -0.185 इतका आहे. मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत. मुंबई, चेन्नई आणि हैदारबाद तिन्ही संघांची सारखीच स्थिती आहे. तिन्ही संघांना प्रत्येकी 4 पैकी फक्त एकच सामन्यात विजयी होता आलं आहे. तर 3 सामन्यात पराभूत व्हाव लागलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.