अनेकांचे whatasapp डाऊन, मेसेज जाईना, स्टेटसही अपलोड होईना !
Marathi April 12, 2025 09:24 PM

जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि तातडीचा संदेशवहन डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअपमध्ये (Whatsapp) अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे समोर आले आहे. जगभरातील बहुतांश व्हॉट्सअप युजर्संना संदेशवहन करण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी आणि मेसेजिंग अॅप खोलताना अडचणी आल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास युपीआय ट्रान्झेक्शनमध्ये तांत्रिक अडचण झाली होती. 57 मिनिटानंतर युपीआय पूर्ववत सुरू झाले. मात्र, आता, सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास व्हॉट्सअॅपमध्ये अडचण आल्याने नेटीझन्स युजर्सं (Netizens) काही काळ गोंधळल्याचं दिसून आलं. त्यामुळे, नेटीझन्स ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देत आहेत.

मार्क झुकरबर्ग यांच्या मालकीच्या मेटा कंपनीने व्हॉट्सप खरेदी केली आहे. दरम्यान, आज सायंकाळी काही युजर्संना मेसेज पाठविण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी अडचण येत होती. त्यामुळे, डाऊनडिटेक्टरवरही अनेक व्हॉट्सअप युजर्संने व्हॉट्सअप डाऊन झाल्यासंदर्भात तक्रारी केल आहेत. व्हॉट्सअप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा मिम्स आणि मजेशीर विनोद शेअर होताना दिसून येत आहेत. तसेच व्हॉट्सअप डाऊन झाल्याची माहिती देखील अनेकांनी ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.

हेही वाचा

गळ्यात कवड्याची माळ, डोक्यावर मावळ्याची पगडी, खांद्यावर पालखी; अमित शाहांचे रायगडावरील हटके फोटो

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.