उन्हाळ्यात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने साधा आहार घेण्याचा सल्ला तज्त्र देतात. यामुळे उन्हाळ्यात चिकन, मटन, मासे असा मांसाहार करावा की करू नये? असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण यावर तज्त्रांचे काय म्हणणे आहे ते बघूया.
मांसाहार
तज्त्रांच्या मते शक्यतो उन्हाळ्यात मांसाहार टाळावा. पण जर तुम्हाला सवयच असेल तर त्याचे प्रमाण नेहमीच्या निम्म्या प्रमाणापेक्षाही कमी करावे. कारण मांसाहारात आपण जे काही पदार्थ खातो ते उष्ण प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता निर्माण होते. शरीराचे तापमान वाढते. घाम य़ेतो.
मासे, चिकन, मटन, अंडी हे गरम असल्याने पचण्यासही जड असतात. यामुळे हे पदार्थ खाल्ल्यानंतर पचनशक्ती मंदावते. जर पाचन क्रिया बिघडली तर जुलाब होतात.
चिकनला हीट फूड असेही म्हटले जाते. त्यामुळे या दिवसात जर तुम्ही अतिप्रमाणात चिकन खाल्ले तर तुम्हाला अर्थरायटीस साऱखे आजार होण्याची शक्यताही वाढते.कारण चिकनमध्ये यूरिक अॅसिड असते. ज्यामुळे हाडे ठिसूळ होतात. तसेच युटीआयशी संबंधित समस्याही महिलांना भेडसावू शकतात. यामुळे उन्हाळ्यात मांसाहार टाळलेला बरा.
तसेच अन्नपचन योग्य न झाल्यास पोटात गॅस निर्माण होणे, पोट फुगणे, आंबट ढेकर, अॅसिडीटी, बद्धकोष्ठ अशा समस्याही निर्माण होतात. कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे हाय बीपीबरोबरच हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोकाही वाढतो. म्हणूनच तज्त्रमंडळी या दिवसात मांसाहार टाळण्याचा सल्ला देतात.
जर तुम्ही या दिवसात नियमित बटर चिकन, चिकन फ्राय, चिकन बिरयाणी खात असाल तर वजन वेगाने वाढते. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चिकन टाळलेलं बरे.