Sushma Andhare wrote letter to all Party workers on Tanisha Bhise death case
Marathi April 06, 2025 09:24 PM


मुंबई : भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नीकडे 10 लाख रुपये नव्हते म्हणून उपचार नाकारला. त्यामुळे आता पुण्यातील दीनानाथ रुग्णालय टीकेच्या केंद्रस्थानी आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे स्वीय सहाय्यक असूनही तसेच मंत्रालयातून अनेकदा फोन येऊनही रुग्णालयाने त्यांच्या त्यांच्या पत्नी तनिषा यांच्यावर वेळेवर उपचार केले नाहीत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सर्वच राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी फक्त तनिषा भिसे यांच्या मृत्यूमुळे झालेल्या वेदनाच व्यक्त केल्या नाहीत, तर कार्यकर्त्यांच्या जीवनातील कटू सत्यदेखील मांडले आहे. (Sushma Andhare wrote letter to all Party workers on Tanisha Bhise death case)

हेही वाचा : Uddhav Thackeray : “भाजप देशात विष कालवतंय, लोकांना तणावग्रस्त आयुष्य जगायला लावतंय,” उद्धव ठाकरेंचा आरोप 

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रामध्ये रुग्णालय प्रशासनाची असंवेदनशीलता आणि शासनाच्या भोंगळ कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘एखाद्या आमदाराच्या कुटुंबातील व्यक्तीवर अशी वेळ आली असती, तर ती व्यवस्था तात्काळ सक्रिय झाली असती. मात्र, कार्यकर्त्यांच्या बाबतीत असे होत नाही, हेच वास्तव आहे’ असे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच या पत्रामध्ये त्या म्हणाल्या की, ” मला जर माझ्या कार्यकर्त्याला जो माझ्यासाठी 24 तास सातही दिवस घरादारावर तुळशीपत्र ठेवून पूर्ण वेळ काम करत असेल आणि त्याच्या कुटुंबाप्रति माझ्या जबाबदारीचे मला भान नसेल तर थू आहे माझ्या मराठी असण्यावर,” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

“सुशांत भिसे यांची पत्नी तनिषाचा यांचा मृत्यू हे एक निमित्त आहे. पण या निमित्ताने संपूर्ण कार्यकर्ता जमातीला एक धडा शिकण्याची गरज आहे. कोणत्याही पुढाऱ्याच्या मागे कार्यकर्ता दिवस-रात्र पळत असतो. नेत्यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आपली बायका मुले रस्त्यावर येतील का? त्यांच्या काही दैनंदिन गरजा आहेत का? आरोग्य, शिक्षण, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता झाली आहे का? याचाही विचार न करता कार्यकर्ता पुढार्‍यांच्या मागे उर फुटेस्तोर धावत राहतो. त्याच्या या धावण्याची किंमत नेता बनवणाऱ्या संबंधिताला असते का?” असा सवाल त्यांनी या पत्रामध्ये विचारला आहे. “एखाद्या आमदाराच्या घरामधील स्त्रीला अशा आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असती तर आमदार कोणत्यातरी योजनेमध्ये बसवता येते का? किंवा अजून कोणाकडून फोन करता येतील का? यासाठी धडपडत राहिले असते. रुग्णालय प्रशासनाला पुन्हा कधीतरी धडा शिकवता येईल? पण आत्ता आपल्या घरातील स्त्रीचा जीव वाचवणे गरजेचे आहे याचा विचार केला असता.” असे सुषमा अंधारे म्हणाले आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.