उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये दोन अल्पवयीन मुलींना ओलीस ठेवून चार मुलांनी बेदम मारहाण केली. मुलींची छेडही काढली. आरोपींनी पोलिसांनाही धडक दिली आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोघांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुलींना मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मुलींना थप्पड मारत असल्याचं दिसतंय.
रविवारी कपकोट पोलिसांनी तनुज गडिया, दीपक उर्फ दक्ष यांच्यासह चौघांना अटक केलीय. पॉक्सो अंतर्गत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून सोबत खोलीत नेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
मुलींची छेड काढून त्यांना मारहाण केली. त्याना थप्पड मारताना व्हिडीओसुद्धा बनवले. मुली रडत होत्या, हात जोडत होत्या पण त्यांच्यावर अन्याय होत राहिला. रविवारी दुपारी पोलिसांनी चारही आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली. यावेळी तीन आरोपी पळून बागेश्वरला गेले.
रात्री उशिरा बागेश्वरमध्ये पोलीस गस्त घालत असताना नंबर प्लेटशिवाय असलेल्या कारला अडवलं. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडताच कारमधील तीन तरुण पोलिसांना धक्का देऊन पळाले. यावेळी पोलिसांच्या जीपलाही धडक देण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, लवकरच या आरोपींना अटक केली जाईल.