Ghibli Art : सगळ्यात पहिली Ghibli इमेज कोणी बनवली? फोटो क्षणार्धात व्हायरल
GH News April 07, 2025 12:09 PM

आजच्या सोशल मीडियाच्या काळात रोज नवनवे ट्रेंड्स येत असतात, व्हायरलही होतात. सध्या अशाच एका ट्रेंडने जगभरात धूमाकूळ घातला आहे, तो म्हणज Ghibli इमेज ट्रेंड. तो इतका व्हायरल झाला आहे की सर्व्हरवरील दबाव खूप वाढला आहे हे OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांना गेल्या 7 दिवसात दोनदा सांगावं लागला आहे. संपूर्ण जगभरात गाजलेल्या या घिबलीचा ट्रेंड कसा सुरू झाला आणि कोणाची घिबलीची इमेज पहिल्यांदा व्हायरल झाली हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया.

अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील सिएटल येथे राहणारा ग्रँट स्लॅटन हा सॉफ्टवेअर इंजीनियर घिबलीच्या व्हायरल ट्रेंडचा चेहरा बनला आहे.हा स्टॅलन नेमका कोण आणि त्याने काय केलं तेही समजून घेऊया.

OpenAI ने 26 मार्च ला सुरू केलं हे फीचर

अमेरिकन AI कंपनी आणि ChatGPT मेकर OpenAI ने 26 मार्च रोजी त्यांच्या नवीन इमेज मेकर टूल 4o ची घोषणा केली. यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर स्लॅटन यांनी या टूल्सचा वापर करून त्यांचे फॅमिली फोटो पुन्हा तयार केले. त्या फोटोमध्ये ते, त्यांची पत्नी आणि श्वान दिसत आहे. त्यांनी Ghibli Studio स्टाइल इमेज जनरेट केली होती.

Grant Slatton यांची पोस्ट

X प्लॅटफॉर्म वर केली शेअर

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या स्लॅटनने हा फोटो X प्लॅटफॉर्मवर शेअर केला. 26 मार्च रोजी त्याने हा फोटो शेअर केला आणि काही तासांतच हा फोटो इंटरनेटवर तूफान वेगाने व्हायरल झाला. या घिबलीच्या फोटोने इंटरनेटवर लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले.

कोण आहे Grant Slatton?

Grant Slatton हा बऱ्याच काळापासन टेक उद्योगाशी संबंधित आहे. त्याने प्रत्यक्षात अनेक कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांनी ॲमेझॉन वेब सर्व्हिसमध्ये सीनियर इंजिनिअर म्हणूनही काम केलं. सध्या ते Row Zero चे संस्थापक इंजिनिअर आहे. तिथे तो जगातील सर्वात वेगवान स्प्रेडशीट्स तयार करण्यात योगदान देत आहे. त्याला AI संशोधनाची सखोल माहिती आहे.

Ghibli म्हणजे काय ?

Ghibli स्टाइल फोटोंमध्ये सॉफ्ट कलर टोन, डिटेलिंग आणि जादुई थीम असे पेंटिंग असतात. OpenAI च्या नवीन टूलच्या मदतीने ही स्पेशल आर्ट स्टाइल सहजपणे पुन्हा तयार केली जाऊ शकते.

जपानमधून झाली सुरूवात

घिबली स्टाइलमधील फोटो खरेतर एका प्रसिद्ध जपानी ॲनिमेशन कंपनीकडून आलेला आहे. ही कंपनी Hayao Miyazaki यांनी तयार केली आहे. या स्टुडिओने स्पिरिटेड अवे, माय नेबर तोटोरो आणि किकीज डिलिव्हरी सर्व्हिस सारखे चित्रपट बनवले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.