Listings This Week : चालू आठवड्यात आयपीओ बाजार थंडच, पण ३ कंपन्या होणार सूचीबद्ध
ET Marathi April 07, 2025 02:45 PM
मुंबई : चालू आठवड्यात आयपीओ बाजारात कसलीच हालचाल नसेल. ७ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आठवड्यात आयपीओंचा दुष्काळ कायम राहणार आहे. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही कोणताही नवीन आयपीओ उघडणार नाही. मेनबोर्ड सेगमेंटमध्ये दीड महिन्यांहून अधिक काळ कोणताही नवीन आयपीओ आलेला नाही. या विभागातील शेवटचा आयपीओ क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सचा होता. तो १४-१८ फेब्रुवारी दरम्यान खुला होता. आता नवीन आठवड्यात एसएमई आयपीओचाही दुष्काळ सुरू झाला आहे. तर या आठवड्यात ३ कंपन्या शेअर बाजारात पदार्पण करणार आहेत. तिन्हीही कंपन्या एसएमई विभागातील आहेत. रेटॅगिओ इंडस्ट्रीजचा आयपीओ १५.५० कोटी रुपयांचा हा आयपीओ २७ मार्च रोजी उघडला आणि २ एप्रिल रोजी बंद झाला. आयपीओला एकूण १.८६ पट सबस्क्रिप्शन मिळाले. आयपीओमध्ये ६१.९८ लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले. आता शेअर्सचे लिस्टिंग ७ एप्रिल २०२५ रोजी बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर होईल. कंपनी कर्ज फेडण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उभारलेल्या निधीचा वापर करेल. स्पिनारू कमर्शियल आयपीओआयपीओचा आकार १०.१७ कोटी रुपये होता. यामध्ये १९.९४ लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले. हा आयपीओ २८ मार्च रोजी उघडला आणि ३ एप्रिल रोजी बंद झाला. आयपीओला एकूण १.५२ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले. हे शेअर्स ८ एप्रिल २०२५ रोजी बीएसई एसएमईवर सूचीबद्ध होणार आहेत. कंपनी आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सामान्य कॉर्पोरेट खर्च पूर्ण करण्यासाठी करेल. इन्फोनेटिव्ह सोल्युशन्स आयपीओहा आयपीओ २८ मार्च रोजी उघडला आणि ३ एप्रिल रोजी बंद झाला. आयपीओचा आकार २४.७१ कोटी रुपये होता. यामध्ये ३१.२८ लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले. या आयपीओला एकूण ४.५३ पट सबस्क्रिप्शन मिळाले. कंपनीचे शेअर्स ८ एप्रिल २०२५ रोजी बीएसई एसएमईवर सूचीबद्ध होणार आहेत.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.