CID 2 : एसीपी प्रद्युमनची CID मधून एक्झिट, शिवाजी साटम यांची जागा कोण घेणार? 'या' अभिनेत्याची लागली वर्णी
Saam TV April 07, 2025 03:45 PM

सध्या सर्वत्र 'सीआयडी २'ची चर्चा पाहायला मिळत आहे. 'सीआयडी २' चा मोठा चाहता वर्ग आहे. या शोतील पात्र चाहत्यांना खूप आवडतात. मीडिया रिपोर्टनुसार, 'सीआयडी २' मधील एसीपी प्रद्युमनची भूमिका करणारे अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) मालिकेटचा निरोप घेणार आहे. त्यामुळे शिवाजी साटम यांच्या जागी सुपरकूल अभिनेत्याची वर्णी लागली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, '२'मध्ये शिवाजी साटम यांची जागा अभिनेता समथान (Parth Samthaan ) घेणार आहे. सोशल मीडियावर देखील याच चर्चा पाहायला मिळत आहे. सध्या या संबंधात पार्थ समथानची शोच्या निर्मात्यांशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे असे ही बोले जात आहे की, पार्थ समथान एसीपी प्रद्युमनची जागा न घेता शोमध्ये एक नवीन पात्र म्हणून एन्ट्री घेणार आहे. ज्याचे नाव एसीपी अंशुमन असे असणार आहे.

'सीआयडी' चे दुसरे पर्व देखील खूप गाजत आहे. या शोमध्ये एसीपी प्रद्युमनचा मृत्यू झालेल्याचे दाखवणार असल्याचे बोले जात आहे. त्यामुळे एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारणारे अभिनेते साटम यांची एक्झिट होणार आहे.

पार्थ समथानने आजवर अनेक हिट मालिका केल्या आहेत. 'बेस्ट फ्रेंड्स फॉरएवर' या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'कैसी ये यारियां' या मालिकेमुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. 'सीआयडी २'च्या माध्यमातून पार्थ समथान पाच वर्षांनी हिंदी मालिकाविश्वात पुनरागमन करणार आहे.

सीआयडीचे कलाकार एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत आणि इन्स्पेक्टर दया हे त्रिकूट पाहायला चाहत्यांना खूप आवडते. या शोची प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. सीआयडी या शोने 2018 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. सीआडीने तब्बल 20 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 21 डिसेंबर 2024पासून 'सीआयडी २' प्रेक्षकांच्या भेटीला आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.