धाराशिवच्या उमरगा परिसरात गारांचा पाऊस
अवकाळी पावसाने फळबागा आणि आंब्याचे मोठे नुकसान
धाराशिव च्या उमरगा तालुक्यातील मुरूम परिसरामध्ये गाराचा पाऊस
गारांचा पडल्याने शेतकऱ्यांच्या फळबागांचे झाले नुकसान
मुरूम परिसरातील मूळज आणि परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि बरसल्या गारा
सप्तशृंगी गड यात्रेला जाणाऱ्या वृद्ध भाविकाचा अंघोळी दरम्यान मृत्यूचैत्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक पायी प्रवास करत जात आहे,याच पायी प्रवासादरम्यान, एका वृद्ध भाविकाचा अंघोळीच्या वेळी मृत्यू झाला. ही घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे गुरुवारी घडली. कैलास बुधा सोनवणे (वय ६०, रा. सांगवी, ता. शिरपूर, जि. धुळे) असे निधन झालेल्या भाविकाचे नाव आहे.
विठेवाडी परिसरातील भालचंद्र निकम यांच्या शेतात थांबून त्यांनी पाण्याची व्यवस्था पाहून अंघोळ केली. याच दरम्यान सकाळी सुमारे 11 ते 12 वाजेच्या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि ते अंघोळीच्या ठिकाणीच कोसळले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीवरून मृत्यूचे नेमके कारण उष्माघात किंवा हृदयविकाराचा झटका असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह दाखल करण्यात आला आहे.तर देवळा पोलीस अधिक तपास करीत आहे.
विक्रोळी येथे गॅस सिलेंडर दरवाढविरोधात आमदार सुनील राऊत यांचे आंदोलनकेंद्र सरकारची तिरडी यात्रा आंदोलन केल्याने आमदार सुनील राऊत यांच्यासह तीनशे शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विक्रोळी पोलिसांनी अनधिकृत आंदोलन करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुण्यात प्रवासी आणि पीएमपीच्या वाहकामध्ये हाणामारीपीएमपीएलच्या मागच्या दाराने उतरण्यास तरुणाला विरोध केल्याने प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला. बसस्टॉप वर प्रवासी हा पाठीमागील दरवाजाने उतरत होता.त्यावरून हाणामारी झाली.
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील पोस्ट ऑफिसला लागली आगसोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असलेल्या जेऊरमधील पोस्ट ऑफिसला आग लागलीय. पोस्ट ऑफिसच्या पत्र्यातून धुरीचे लोट उठले आहेत. आग कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. आज महावीर जयंतीनिमित्त पोस्ट ऑफिसला सुट्टी असल्याने सुदैवाने कोणताही कर्मचारी आणि ग्राहक ऑफिसमध्ये नव्हते.
उल्हासनगरात पाया सूपची गाडी लावण्यावरून वाद!उल्हासनगरात पाया सूपची गाडी लावण्यावरून वाद होऊन एका दिव्यांग शीख तरुणाला ५ ते ६ शीख तरुणांनीच मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
रायगडच्या रोह्यात ठाकरे गटाला मोठा धक्कारायगडच्या रोह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपला राजिनामा पक्षाकडे पाठवून दिला असून येत्या 13 एप्रिल रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपास्थितीत रोहा इथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. समीर शेडगे हे आधी सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र आठ वर्षापूर्वी रोहा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्याने शेडगे पक्षातून बाहेर पडले आणि अपक्ष निवडणूक लढवली. त्यानंतर शेडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
बँक कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने वयोवृद्धांना करावा लागतोय मनस्तापनंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात असलेल्या युनियन बँकेत बँक कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा समोर आला आहे बँक कर्मचारी हे वेळेवर बँकेत येत नसल्याचा तक्रारी नागरिक करत आहेत तर खेड्यापाड्यातील येणाऱ्या आदिवासी बांधवांना तासंतास बँकिंग कामासाठी उभं राहावा लागत असल्याची परिस्थिती आहे. वयोवृद्ध नागरिकांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून वेळेवर बँक कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे तासंतास त्यांना उभं राहावं लागत असल्याची परिस्थिती आहे..
पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या बाणेर भागातून ६ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्तपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस कर्मचारी बाणेर भागात गस्त घालत होते.
अर्जुन लिंगराज टोटिगर (२६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव
पुणे पोलिसांनी जप्त केला ६ लाख रुपयांचा हायड्रोफोनीक गांजा
यावेळी एक व्यक्ती हा हायड्रोफोनीक गांजा विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती त्यांना मिळाली यावरून त्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.
त्याची झडती केली असता त्याच्या जवळ ५ लाख ५६ हजार किमतीचा ३० ग्रॅम ५४० मिली ग्रॅम ओझोकुश गांजा (हायड्रोफोनीक गांजा) मिळून आला.
अर्जुन हा मार्केटींग आणि सेल्सचा पदवीधर असून सध्या तो खाजगी कंपनीमध्ये काम करीत आहे
त्याच्या विरोधात आता बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Pune News: धोकादायक पद्धतीने कार रेसिंग करणाऱ्या आणि सोसायटीतील नागरिकांना धमकावणार्यांविरोधात कारवाई- वाघोली पोलीसांनी कार चालक आणि कार ताब्यात घेत केली कारवाई
- वाघोली येथील न्याती इलान सोसायटीतील अंतर्गत रस्त्यावर महिंद्रा थार आणि महिंद्रा स्कॉर्पिओ या दोन कारची धोकादायक पद्धतीने रेस लावल्याचे व्हिडिओ झाले होते वायरल
- त्यानंतर सदर कार चालकांनी सोसायटीतील नागरिकांना केली होती दमदाटी
- या प्रकरणी आता वाघोली पोलिसांनी कारवाई करत दोन्ही कारचालक आणि कार विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे
- MH 12 VQ 8218 या थार गाडीवर आणि MH 12 XX 4951 या महींद्रा स्कॅार्पियो गाडी आणि चालकांवर कारवाई
कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन उबाठा गट आक्रमककृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱयांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन उबाठा गट आक्रमक झाला आहे.
उद्धव बाळासाहेब गटाच्या कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात आंदोलन केले आहे. उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या निषेधाचे बॅनर झळकवत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
कालच केंद्रीय आणि राज्याच्या कृषीमंत्र्याच्या दौऱयात काळेझेंडे दाखवण्याचे उबाठा गटाने जाहीर केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल होत.
याच मुद्यावरुन उबाठा आक्रमक झाली असून त्यांनी करण चौफूली परिसरात हे आंदोलन केलेआहे. यावेळी पोलीसांनी उबाठा कार्यकर्त्यांकडील बँनर ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात नेल आहे.
जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला गावात शेतकऱ्यांच्या चाऱ्यांच्या ढिगारांना आणि गोठ्यांना लागली आगआगीमुळे जनावरांना धोका पोहोचण्याची दाट शक्यता
आग विझवण्यासाठी संपूर्ण गावकरी पाणी घेऊन आगीच्या दिशेने, आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू
आगीमध्ये शेतकऱ्यांचे गोठे आणि पत्रांची शेड जळताना प्रत्यक्षात दिसत आहे
विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती ..
गावालगतच शेतकऱ्यांच्या चाऱ्याला आणि गोठ्यांना ही आग लागल्याने मोठ्या प्रमाणात आगीच्या धुराचे लोट सध्या पाहायला मिळत आहे.
गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात शिवसेना उबाठा गटाकडून रस्त्यावर चूल मांडत निषेधकेंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या विरोधात सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आला आहे.
रस्त्यावर चूल मांडत भाकरी थापून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडर मध्ये पन्नास रुपयाची वाढ करण्यात आली आहे,आधीच महागाईच्या झळ सोसत असणाऱ्या सर्वसामान्यांच्यावर गॅस सिलेंडर दरवाढ ही अन्यायकारक असल्याचा आरोप करत शहरातील स्टेशन चौक येथे केंद्र सरकार विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून रस्त्यावर चूल मांडून तव्यावर भाकऱ्या थापून केंद्र सरकारचा निषेध नोंदवत.सर्वसामान्यांच्यावर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ केंद्र सरकारने आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
Nagpur: नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात पहिले निलंबन- नागपूर प्राथमिक शालेय शिक्षण विभागातील वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक निलेश वाघमारे यांचं निलंबन
- नागपूर जिल्ह्यातील पाचशेवर प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती बनावट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहेत.. या संदर्भात प्रथमिक अहवाला नतंर चौकशी सुरू झाली आहे...
- नागपूर जिल्ह्यात 2019 पासून 580 प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोणतीही शहानिशा न करता बनावट शालार्थ आयडी प्रदान करण्यात आला होता...
- नियमबाह्य पद्धतीने वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले
- शासनाच्या प्राथमिक चौकशीत वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमारे दोषी असल्याचे आढळून आले आहे..
- तसेच शासकीय निधीच्या अपहार मध्ये निलेश वाघमारे सहभागी असल्याचा ठपका
Pune: सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी फुलेवाड्याची केली पाहणीउद्या महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे .या निमित्ताने पुण्यातील फुलेवाडा परिसरामध्ये महात्मा फुले यांच्या समाधीस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार पुण्यातील फुलेवाडा या ठिकाणचे केली पाहणी
यावेळी आशिष शेलार यांनी घेतली भुजबळांची भेट
भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली फुले वाड्याचा आपल्या मार्गदर्शनाप्रमाणेच होईल.
Nashik: नाशिक महापालिकेच्या जलतरण तलाव शुल्कात १० टक्क्यांची वाढ- नाशिक महापालिकेचा उत्पन्न वाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- परिवारातील चार जणांसाठी असलेले वार्षिक सभासदत्व वाढवले
- 22,032 रुपयांचे वार्षिक सभासदत्व आता जीएसटी सह 24,481 रुपये होणार
- देखभाल खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर दैनंदिन खर्चात वाढ झाल्यामुळे शुल्क वाढीचा निर्णय
- महापालिकेकडून शुल्क वाढी संदर्भात खुलासा
- दरवाढीनंतर देखील जलतरण तलाव वापरणाऱ्यांची संख्या कायम राहण्याची अपेक्षा
Hingoli: जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्याने हिंगोलीकरांचा वाढता पाठिंबाहिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची रुजू झाल्याच्या सहा महिन्यानंतर बदली झाली आहे, कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्यांच्या कामाला न्याय देणाऱ्या जिल्हाधिकारी गोयल यांची बदली झाल्याने हिंगोलीकरांनी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे, राजकीय सुड भावनेतून जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्याचा आरोप करत आता हिंगोलीकरांनी जिल्हा प्रशासनामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत ही बदली तातडीने रद्द करावी आणि हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी अभिनव गोयल यांना कायम ठेवावे अशी मागणी केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या या बदली संदर्भात अनेक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील दिला आहे
Dhule: भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात जैन समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आली शोभायात्राजैन समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आज धुळ्यातून सकल जैन समाजाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते
या शोभा यात्रेमध्ये मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे,
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची जयंती धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली,
अहिंसा, शांतता आणि समतेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रा, प्रतिमांची पूजाअर्चा आणि विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले,
यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेली मुले व महिलांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, जैन बांधवांनी आपली सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून मिरवणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला.
भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन समाज बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूकभगवान महावीर यांची आज 2624 वी जयंती जैन समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
नंदुरबार शहरातील अजित नाथ मंदिरापासून भव्य मिरवणुकीला प्रारंभ होत मिरवणूक मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत माजी आदिवासी विकास मंत्री विद्यमान आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित यासोबतच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भगवान महावीर मिरवणूक अजितनाथ मंदिरापासून सुरू होऊन जळका बाजार सोनार खुंठ महाराष्ट्र व्यायाम शाळा मार्गे गांधी पुतळा येथून महावीर मंदिर दादावाडी येथे मिरवणुकीची सांगता झाली.
ज्याचा मामा अमरावतीचा तो मंत्री होतोच, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचं अमरावतीत वक्तव्यमी 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलो, त्यांनतर मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे गेलो तेव्हा ते म्हणाले की ज्याचा मामा अमरावतीचा तो मंत्री होतोच.....तुम्ही देखील मंत्री व्हाल आणि मी झालो..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामा अमरावतीचे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मामा देखील अमरावतीचे आणि पंकज भोयर यांचे मामा देखील अमरावतीचे असल्याने त्यांनी अमरावतीकरांचे आभार मानले........
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,व राज्यमंत्री पंकज भोयर हे आज एकाच मंचावर आज देशाचे पाहिले कृषी मंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या 60 व्या पुण्यतिथी महोत्सवात उपस्थित असताण भोयर यांनी ते वक्तव्य केल..
Dombivali: डोंबिवलीत संतापजनक घटना, 30 वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने केला अत्याचारनातेवाईकांकडे जात असताना आरोपी रिक्षाचालकाने अज्ञात ठिकाणी नेऊन केला अत्याचार
फैजान खान असे अत्याचार करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव
टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात आरोपी फैजान खानला ठोकल्या बेड्या
Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात दूषित पाण्यामुळे तापाची साथनवापूर शहरात पाण्यातून पिवळ्या तापाची साथ प्रशासनाची तातडीने दखल घेत आरोग्य विभागाची तपासणी मोहीम सुरू...
नवापूर शहरातील गेल्या काही दिवसांपासून पिवळ्या तापाचे जॉन्डिस रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.
या भागांतील फक्त एका गल्लीत सुमारे 14 ते 15 रुग्णांची नोंद झाली आहे, त्यात लहान मुलांची संख्या जास्त असून, अनेक पालक चिंतेत.....
या आजाराचे मुख्य कारण म्हणजे दूषित व अशुद्ध पाण्याचा पुरवठा, जो की नवापूर नगरपरिषदेच्या पाण्याच्या लाईनमधून होतो आहे. हे समस्या काही दिवसांची नसूनअनेक महिन्यांपासून पाण्यात चव, रंग व गंध आढळून येत आहे.....
पाणीपुरवठ्याची लाईन आणि नळाचे नमुने देखील तपासण्यात आले असून पाण्याचे सॅम्पल प्रयोगशाळेसाठी गोळा करण्यात आले आहेत.
ही घटना नवापूर शहरासाठी साथीच्या रोगाचा इशारा ठरू शकते, त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पावले उचलून सुरक्षित व स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, तसेच रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिरे व उपचार योजना राबवण्याची ग्रामस्थांची मागणी....
Maharashtra Politics: वाढत्या महागाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन- घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पन्नास रुपयांची वाढ केलाच्या निषेधार्थ आंदोलन
- पुण्यातील फडके हैद चौकात आंदोलन
- सिलेंडर ठेऊन आणि त्यासमोर चुली पेटवून आंदोलन
- महीला शिवसैनिकांकडुन चुलीवर प्रतिकात्मक स्वयपांक
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त उद्या पुण्यात विविध कार्यक्रमराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ फुलेवाडीची करणार आज पाहणी
उद्या फुले वाड्यात विविध कार्यक्रमांचा आयोजन
छगन भुजबळ पाहणीनंतर पत्रकार परिषद घेणार
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 4 एप्रिलला होणार राज्यातील ई-सेवा केंद्र पुढील पाच दिवस राहणार बंदराज्यातील आपले सरकार पोर्टल अर्थात ई-सेवा केंद्र आजपासून पुढील पाच दिवसांसाठी, म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत.
महा ऑनलाइन च्या सर्व्हर मधील नियमित देखभाल आणि तांत्रिक सुधारणांच्या कामासाठी हे बंद राहणार आहे यामुळे राज्यातील नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सरकारी सेवा,व विद्यार्थ्यांना अति आवश्यक कागदपत्रे उत्पन्न प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलिअर , रहिवासी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जात पडताळणी स्टंटल जात प्रमाणपत्र दुकान परवा अशा अनेक कागदपत्रे ई सेवा केंद्र मिळतात विविध सरकारी योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया यांचा समावेश होतो.केंद्र बंद राहिल्याने या कामांसाठी नागरिकांना पुढील पाच दिवस अडचणींना सामोरे जावे लागणार आहे
विद्यार्थी,नोकरी शोधणारे आणि ज्यांना आवश्यकता शासकीय कामांसाठी कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्यांना याचा चांगलाच फटका बसणार आहे
Nanded: गुन्हेगारांना एकत्रित करून नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिली शपथगुन्हेगारी रोखण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी ग्रामीण हद्दीतील असलेल्या गुन्हेगारांना एकत्रित करून त्यांच समुपदेशन केल आहे. यापुढे मी गुन्हा करणार नाही केला तर माझ्यावर कडक कारवाई होईल अशी शपथ सुद्धा देण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांची विभागणी करून पोलिसांच्या वतीने विशेष लक्ष ठेवल जात आहे.
Solapur: सोलापुरातील पाकणीत एक इथेनॉलने भरलेला तर दोन रिकाम्या टँकरला लागली भीषण आग- आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही मात्र दोन जण किरकोळ जखमी
- अचानक लागलेला आगीमुळे इथेनॉलच्या तिन्ही टँकरचे लाखो रुपयांचे नुकसान
- जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
- आग विझवण्यासाठी दहा ते पंधरा अग्निशामक गाड्यांची मदत
- तीन टँकरला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे मोठ्या प्रमाणात लोट
Nandurbar Weather: नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारात 43 अंश सेल्सिअसवरवाढत्या तापमानाचा पपई फळबागांना मोठा फटका......
उन्हापासून पपई बागांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड .....
उन्हाचा तीव्रतेमुळे पपईचे पाने करपत असल्याची परिस्थिती.....
तीव्र उणामुळे पपईला कापडाचे आवरण.....
वाढत्या उन्हामुळे पपईचा उत्पादनात घट येण्याची शक्यता.....
पालकमंत्री मकरंद जाधव यांनी घेतली आत्महत्या केलेल्या कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेटबुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाड येथील युवा शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा प्रकल्पातून 14 गावांना पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली होती, त्यांच्या कुटुंबीयांची पालकमंत्री मकरंद जाधव यांनी सांत्वन्पर भेट घेत, राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने 11 लाख रुपयांची मदत दिली आहे.. सोबतच 14 गावांना खडकपूर्णा प्रकल्पातून लवकरात लवकर पाणी देण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्याचही पालकमंत्री मकरंद जाधव यांनी यावेळी सांगितल आहे...
उमरगा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वायाधाराशिव च्या उमरगा शहरातला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जकेकुर चौरस्ता येथील फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
ऐकीकडे उमरगा शहराला पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला केला जात असताना ऐन उन्हाळ्यात पाईपलाईन फुटल्याने याची प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरीकांतुन केली जात आहे.
Navi Mumbai: आज नवी मुंबईत पाणी पुरवठा राहणार बंदआग्रोळी ब्रिज जवळील रेल्वे ट्रॅक लगत असणाऱ्या मोरबे जलवाहिनी वरील पाणी गळती रोखण्यासाठी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आलेय.
नवी मुंबई मनपा क्षेत्रासह सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे मध्ये देखील पाणी पुरवठा राहणार बंद.
तर उद्या कमी दाबाने होणार पाणी पुरवठा.
पाणी जपून वापरण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन.
Weather News: चार दिवसांच्या उच्चांकी तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार- आय एम डी च्या संकेतस्थळावर माहिती
- गेले पाच दिवस नाशिकमध्ये जाणवला उन्हाचा सर्वाधिक चटका
- आजपासून उष्णतेचा पारा कमी होणार
- सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची झालीय नोंद
- आता दररोज एक अंशाने तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज
- तरीही नागरिकांनी दुपारच्या वेळेला काळजी घेण्याचे आवाहन
- कडक उन्हापासून नाशिककरांना किमान आठवडाभर तरी दिलासा मिळण्याची शक्यता
Nashik News: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक- महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी ११ एप्रिलला रात्री १२ वाजता बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारच आंदोलन
- कृषीमंत्र्यांच्या घरावर प्रहारच मशाल आंदोलन
- कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला जाग आणण्यासाठी बच्चू कडू कृषीमंत्र्यांच्या घरासमोर मशाल पेटवून करणार आंदोलन
- मध्यरात्री १२ वाजता बच्चू कडू करणार मशाल पेटवून आंदोलन
Nashik: नाशिक पोलिसांचा नाशिककरांना सुखद धक्का- तब्बल २०० नागरिकांचा चोरीला गेलेला १ कोटी ३२ लाखांचा मुद्देमाल केला परत
- सोन्याचे दागिने, मोबाईल, दुचाकी, चारचाकी वाहनांसह अन्य महागड्या वस्तू केल्या परत
- चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
कचरा वाहतूक कामगारांचे काम बंद आंदोलन चर्चेनंतर अखेर मागेघनकचरा विभागातील कचरा वाहतूक कामगारांनी आज सुरु केलेले काम बंद आंदोलन अखेर मागे घेण्यात आलेय.
कचरा वाहतूक करणाऱ्या नवीन वाहनावरील कामगार कमी करू नयेत, लहान वाहनावर 2 कामगार कार्यरत ठेवावे या मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते.
अखेर कामगार नेते रवींद्र सावंत आणि कंपनी व्यवस्थापना सोबत झालेल्या चर्चे नंतर कामगारांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतलेय.
यासंदर्भात शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिलाय.
एसटी कर्मचाऱ्यांना मार्चचं निम्मच वेतन, पुण्यात एसटी कर्मचारी आक्रमककामगार संघटनेकडून एसटी प्रशासना विरोधात संताप
एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% च वेतन मिळणार
वेतन पूर्ण द्या अन्यथा आंदोलन करू
एसटी कर्मचारी संघटनेचा इशारा
आमचेच वेतन दरवेळी का थकवल जात
लवकर निर्णय घेऊन उर्वरित वेतन द्या अन्यथा काम बंद आंदोलन करू
सरकार मुद्दाम अन्याय करत आहे
अचानक वेतन का थांबवलं सरकारला सवाल
जालन्यातील निपाणी पोखरी येथे शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ज्वारीचे पीक जळून खाकजालन्यातील निपाणी पोखरी येथे शॉर्टसर्किटमुळे जगन देशमुख या शेतकऱ्याचे दोन एकर ज्वारीचे पीक जळून खाक झाल आहे.
महावितरणच्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन उभ्या असलेल्या आणि सोंगनी केलेल्या ज्वारीला आग लागली आणि या आगीमध्ये जवळपास दोन एकर ज्वारीच पिक जळून खाक झाल आहे.
यामुळे शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान तर झालंच आहे मात्र जनावरांसाठी लागणारा वर्षभराचा चारा जळून खाक झाला आहे.
दरम्यान जालना जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी भेट देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे...
सफाळेनंतर पश्चिम रेल्वे वरील पालघरमधील आणखी एक रेल्वे फाटक कायमचं बंदपालघरच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणार नवली फाटक कायमस्वरूपी बंद .
नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा रेल्वे प्रशासनाचा आवाहन...
डी एफ सी रेल्वे ट्रॅकवर मालगाडी चालवण्यासाठी आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या न्यू उंबरगाव रोड स्टेशन ते न्यू सफाळे स्टेशन पर्यंतच्या कामासाठी फाटक बंद करण्यात आल्याची माहिती
पुणेकरांसाठी खुशखबर, शहरात यंदा पाणीकपात नाहीशहराला १५ जुलैपर्यंत पुरेल इतका धरणात पाणीसाठा
गतवर्षीपेक्षा यंदा खडकवासला धरण साखळीत दोन टक्क्यांनी पाणी अधिक
खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये ११.९१ टीएमसी इतका पाणीसाठा
पुण्यासाठी खडकवासला प्रकल्पामधील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या चार धरणांतून पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व धरणांमध्ये सध्या ४०.८३ टक्के पाणी उपलब्ध असल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नाही
पुण्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जयंत पाटलांचा मेट्रोने प्रवासपुण्यातील वाहतूक कोंडीला कंटाळून जयंत पाटलांनी केला मेट्रो प्रवास, आमदार बापूसाहेब पठारे यांच्या चिरंजीवाचे लग्नानंतरचा आहे स्वागत समारंभ कार्यक्रम, खराडी या ठिकाणी कार्यक्रम असल्याने वाहतूक कोंडीला कंटाळून जयंत पाटलांनी केला मेट्रो प्रवास, पुणे नगर रस्त्यावर सातत्याने होत होती वाहतूक कोंडी, याच वाहतूक कोंडीमुळे जयंत पाटलांना गाडी सोडून करावा लागला मेट्रोने प्रवास
एकरी तीन लाखांचा होतोय नफा 15 एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड, औषधी कंपन्यांशी करारनांदेडमध्ये सध्या औषधी मिर्चीच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय, नांदेडच्या देगांव गावातील शेतकऱ्याने कंपनीसोबत करार करत सुमारे पंधरा एकर क्षेत्रावर या औषधी मिरचीचे उत्पादन घेतलंय. बावीस हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दराने ही मिरची खरेदी करण्याचा करार औषधी कंपनीसोबत झालेला आहे. एकरी पंधरा ते विस क्विंटल इतकं उत्पादन या मिरचीचे निघत असते. त्यातून उत्पादन खर्च काढला तरी प्रति एकर तीन लाखांचा नफा होतो असे या शेतकऱ्यांने सांगितले. औषधी कंपन्यांशी रीतसर करार करून शेतकऱ्यांनी हा प्रयोग करायला हवे असे या शेतकऱ्यांने सांगितले.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उमरी जहागीरच्या वृक्षप्रेमींने स्वखर्चाने केली झाडांची रंगरंगोटीवृक्षांच्या सौंदर्यात एका शेतमजुराने भर घातली आहे. आपल्या स्वखर्च्यातून या शेतमजुराने वृक्षांची रंगरंगोटी केली आहे. संजय लगड असं या शेतमजुराचं नाव आहे.
लगड हे हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर या गावचे रहिवासी आहेत. उमरी जहागीर या गावाच्या सुरुवातीला झाडे लावण्यात आली आहेत.
या झाडांना संजय लगड या शेतमजुराने श्रमदान करत स्वखर्चाने रंगरंगोटी केली आहे. झाडे लावा झाडे जगवा असा काहीसा संदेश देण्याचा संजय लगड या वृक्षप्रेमीने हा छोटासा प्रयत्न केला आहे.
या झाडांना रंग रंगोटी केल्याने झाडांच्या सौंदर्यात भर पडली आहे. संजय लगड या वृक्षप्रेमी चे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे.
झाडे आपल्याला सावली फळ आणि ऑक्सिजन देतात. त्यामुळे या छोट्याशा उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकानी वृक्ष चळवळ निर्माण केली पाहिजे असे मत संजय लगड या वृक्षप्रेमींनी व्यक्त केले.
Ratnagiri: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यात 1 हजार 37 कोटींच्या गुंतवणूकीचे सामंजस्य कराररत्नागिरीत जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यात 1 हजार 37 कोटींच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आला.
या परिषदेचं उद्घाटन उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब बनत चालली आहे.
पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसेच पर्यटन प्रकल्पासाठी महिलांनी आता पुढे आलं पाहिजे, असं आवाहन उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी केलं.
लोटे परशुराम येथे सुप्रिया केमिकल्स 550 कोटी गुंतवणूक करणार आहे. एमएसएमईच्या माध्यमातून 500 कोटी गुंतवणुकीचा समावेश आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 115 टक्के उद्दिष्ट पूर्ण करत जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे.
सबसिडी देण्याचे प्रमाण 98 टक्के असल्याचं यावेळी सामंत यांनी सांगितलं..या परिषदेला बँकर्स, गुंतवणूकदार, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्कामही कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातच होणारकाल न्यायालयातील कागदोपत्री वेळेत प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे आणि आज शासकीय सुट्टी असल्यामुळे तांत्रिक अडचण
उद्या दुपारनंतर कोरटकर ची सुटका होण्याची शक्यता
5 दिवस पोलीस कोठडी आणि दहा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीनंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरडकर ची केली आहे जामिनावर मुक्तता
मात्र जामीन मिळून ही प्रशांत कोरटकर चा मुक्काम कळंबा मध्यवर्ती कारागृहातच
Dharashiv: वक्फ विधेयका विरोधात मुस्लिम बांधव रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलनसंसदेत मंजुर करण्यात आलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला मुस्लिम बांधवांकडुन कडाडून विरोध केला जात असुन धाराशिव मध्ये बुधवारी मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
दोन तास केलेल्या या आंदोलनात समाज बांधवांनी वक्फ सुधारणा विधेयक समाजावर अन्याय करणारे असल्याचा भावना व्यक्त केल्या
यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वक्फ विधेयक मागे घेण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.
या आंदोलनात हजारो मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते.