उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहारात निरोगी पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे असते. तुमच्या शरीराला योग्य आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये फायबर्स, प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्सचा समावेश करणे गरजेचे असते. निरोगी आरोग्यासाठी, किवी हे एक सुपरफूड मानले जाते, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. पण जेव्हा ते खाण्याचा विचार येतो तेव्हा अनेकदा प्रश्न पडतो की, किवी सोलून खावे की न सोलून? कारण बरेच लोक ते सोलून खातात, तर बरेच जण ते न सोलता खातात.
चला तर मग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया आणि किवी फळाची साल काढून खाणे फायदेशीर आहे की नाही हे देखील समजून घेऊया. आरोग्यासाठी, किवी हे एक सुपरफूड मानले जाते, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. पण जेव्हा ते खाण्याचा विचार येतो तेव्हा अनेकदा प्रश्न पडतो की, किवी सोलून खावे की न सोलून? कारण बरेच लोक ते सोलून खातात, तर बरेच जण ते न सोलता खातात. चला तर मग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया आणि किवी फळाची साल काढून खाणे फायदेशीर आहे की नाही हे देखील समजून घेऊया.
किवी सोलन खाल्ल्यामुळे ते अधिक मऊ आणि चविष्ट लागते. ज्यांना सालीचा पोत आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. ज्या लोकांना ऍलर्जी आहे किंवा संवेदनशील त्वचा आहे त्यांना फायदा होऊ शकतो, कारण काही लोकांना सालीमुळे हलकी खाज येऊ शकते.
किवीची साल सोलून खाल्ल्यामुळे त्यामधील फायबर आणि पोषक तत्वांचे नुकसान होते, कारण सालीमध्येच बहुतेक फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. किवी साल काढून टाकल्याने व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक तत्वांचे प्रमाण कमी होते. किवीचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.
किवीच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असते.
किवी न सोलता खाल्ल्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांमध्ये फायदेशीर आहे.
किवीच्या सालीमध्ये सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
किवीची साल रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
काही लोकांना किवीच्या सालीचा खडबडीत पोत आवडत नाही. जर किवी व्यवस्थित स्वच्छ केली नाही तर त्यात धूळ किंवा कीटकनाशके असू शकतात. त्वचेची संवेदनशीलता असलेल्या लोकांना सौम्य खाज येऊ शकते. जर तुम्हाला किवीची साल खायची असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा: घाण आणि रसायने काढून टाकण्यासाठी किवी पूर्णपणे धुवा. साल थोडीशी ब्रश करून किंवा हलक्या हाताने घासून स्वच्छ करा, जेणेकरून त्याचा खडबडीतपणा कमी होईल. तुम्ही किवी स्मूदी किंवा ज्यूसमध्ये मिसळून सहज सेवन करता येते. किवीचे लहान तुकडे करून खा, यामुळे खाताना साल कमी जाणवेल.