सातारा येथील कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला यश मिळाले आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. रोहिणी खडसे यांनी ट्विट करत भाजपवर टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, 4 महिन्यांपूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपरवर घेतलेल्या 'सहयाद्री कारखाना' निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही. पैशाचा वारेमाप वाटप करुन देखील, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
Supriya Sule : 48 तासात काही निर्णय न झाल्यास आंदोलन करणारपुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेच्या मिळकतकर विभागाची तब्बल 27 कोटींची थकबाकी भरणे बाकी असल्याचे समोर आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या असून यावरून त्यांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलं आहे. पुणे महानगरपालिकेने मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात प्रॉपर्टी टॅक्स बाबत 48 तासात काही निर्णय केला नाही तर महानगरपालिका मध्ये मी आंदोलन करणार असल्याचा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
Deenanath hospital : आरोग्य उपसंचालकाच्या अहवालात गंभीर बाबी आल्या समोरदीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती तनिषा भिसे हिच्या मृत्याला रुग्णालयच जबाबदार असल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाले आहे. सकाळी नऊ वाजता रुग्णालयात दाखल झालेल्या तनिषाला रक्तस्त्राव होत असताना देखील तब्बल पाच तास थांबवून घेतल्याचे देखील अहवालातून उघड झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चौकशी समिती स्थापन केली होती. या प्रकरणी या समितीने अहवाल सादर केला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
Kunal Kamra : मुंबई पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यताकुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने 7 एप्रिलपर्यंत अटक करू नये असे सांगून दिलासा दिला होता. आता ही मुदत संपल्यानंतर तातडीने दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी मुंबई पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयात कुणाल कामराची धावाधावउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या एका गाण्यालाआक्षेप घेतला होता. शिवसैनिकांनी कामरा विरोधात गुन्हा ही दाखल केला होता. कुणाल कामराला चौकशीसाठी नोटीस ही बजावण्यात आली होती. याप्रकरणात कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयातून अटक पूर्व जामीन घेतला होता. त्या अटक पूर्व जामिनाची मुदत 7 एप्रिल म्हणजे आज संपत आहे. त्यामुळे कुणाल कामरा पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करू शकतो. त्याचवेळी चौकशीसाठी पोलिस कामराला ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Deenanath Hospital Case: भिसे कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाला पत्रदीनानाथ रुग्णालयात मृत्यू झालेल्या तनिषा भिसे प्रकरणी भिसे कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पत्र लिहिलं आहे. डॉ. घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांचा पत्रातून केला आहे. घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
Prashant Koratkar live:कोरटकर याच्या अर्जावर आज सुनाणीछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी आहे. दुपारी दोन वाजता सुरू ही सुनावणी होणार आहे. कोरटकरचा बेल मिळणार की त्यांचा जेलमधील मुक्काम वाढणार, याबाबत दुपारी समजेल. कोरटकर सध्या कारागृहात आहे
शेअर बाजार कोसळलाअमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका शेअर बाजाराला बसतो आहे. आज बाजार उघडताच मोठी पडझड झाली. सेन्सेक्स दोन हजार 500 अंकांनी कोसळला. तर, निफ्टी एक हजारहून अधिक अंकांनी कोसळला
वक्फ विधेयकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकावक्फ विधेयकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.केरळमधील समास्था केरला जमियाथुल उलेमा या संघटनेने ही याचिका दाखल केली आहे.
पक्षात जातीचे सेल उघडणे ही मोठी चूकच, बावनकुळेंनी तसे करू नये - नितीन गडकरीजो करेगा जात की बात हो खायेगा लाथ, असे नितीन गडकरी म्हणत असतात. गडकरी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षात जातीचे सेल उघडणे ही मोठी चूक आहे. तसे करू नये, असा सल्ला दिला आहे.
shivraj singh Chauhan : कृषीमंत्री शिवराजसिंह आज नंदुरबारच्या दौऱ्यावरदेशाचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे आज (सोमवारी) नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नंदुरबार कृषि विज्ञान केंद् आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र द्वारे सिलेज आधारित परिसर विकास कार्यक्रम अंतर्गत उभारण्यात आलेल्या 'कृषक ज्ञान विज्ञान मंडपम्' किसान ज्ञान संवर्धन केंद्र यासोबतच 'महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क' या वास्तूंचा लोकार्पण सोहळा कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ते शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करतील.