दीनानाथ रुग्णालयाने उपचार नाकारल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या आरोपांनी खळबळ उडालीय. दीनानाथ रुग्णालयात घडलेल्या प्रकरणी आता चौकशी अहवाल समोर आला असून यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चौकशी अहवालाबाबत माहिती दिली. या अहवालानुसार रुग्णालय दोषी आढळले असून रुग्णालयाने कोणतेही नियम पाळले नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
पेशंटला योग्य उपचार मिळाले नाहीत असा ठपका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर अहवालात ठेवण्यात आलाय. दीनानाथ मंगेशकर, सूर्या हॉस्पिटल आणि ससून रुग्णालयाचा अहवाल दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. त्यांचाही अहवाल समोर येणार आहे. अंतिम अहवाल आज संध्याकाळी येईल त्यात सविस्तर माहिती मिळेल. तर धर्मदाय आयुक्तांचा अहवाल उद्या येणार असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
हॉस्पिटलमध्ये रुग्ण सकाळी ९ वाजून १ मिनिटांनी गेले होते. डॉक्टर यांच्याशी संपर्क झाला आणि सर्जरीसाठी स्टाफकडे सूचना दिल्या. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी १० लाख रुपयांची मागणी केली. ३ लाख रुपये आहेत असं कुटुंबियांनी हॉस्पिटलला सांगितले. २.३० वाजता रुग्ण बाहेर पडला, ५ तास रुग्णावर प्राथमिक उपचार रुग्णालयाने रुग्णावर केलेले नाहीत.
रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यानंतर रुग्णाला ससून मध्ये नेलं. तिथून १५ मिनिटात ते बाहेर आले आणि तिथून सुर्या हॉस्पिटल मध्ये नेलं. दुसऱ्यादिवशी डिलिव्हरी झाली, रक्तस्त्राव झाला आणि रुग्णाचा मृत्यू झाला.
*१० लाख रुपयांची मागणी केल्यामुळे रुग्णाची मानसिकता खचली*
*राज्य समितीचा अहवाल आलेला आहे*
रुग्णालयाने रुग्णावर उपचार करणे अपेक्षित होतं ते रुग्णाला मिळालं नाही, समितीच्या अहवालातून माहिती समोर
रुग्णालयावर हा ठपका ठेवण्यात येतोय
तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि नातेवाईकांनी केलेली तक्रार यावर अंतिम निष्कर्ष होईल
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी सुद्धा याप्रकरणाचा बाबत बोलणे झालं आहे