दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. यामुळे दिवसाढवळ्या बाहेर निघणं मूश्किल झाले आहे. तीव्र उन्हाच्या झळाळीमुळे डोकेदुखी, थंडी, डिहाड्रेशन, उष्माघात यासारख्या गंभीर तक्रारी जाणवत आहेत. उष्माघात ही शरीराच्या अति तापमानामुळे होणारी एक गंभीर समस्या आहे. उष्माघात झाल्यास नक्की काय करावे हे अनेकांना माहित नसते. खरं तर, उष्माघातावर त्वरीत उपचार होणं गरजेचं आहे, नाही तर हे जीवघेणंही ठरू शकते. पण, या दिवसात आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यास उष्माघाताच्या त्रासापासून तु्म्ही नक्कीच वाचू शकतात. आज आपण जाणून घेऊयात उष्माघाताची लक्षणे व उपाय
उष्माघाताची लक्षणे –
- शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक होणे.
- उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे,ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे.
- उष्माघात झाल्यास त्वचा लाल, कोरडी होते.
- जास्त उष्णतेमुळे पोटात जळजळ, उलट्या होऊ शकतात.
- डिहाड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलनामुळे हाता-पायांमध्ये पेटके येतात.
- अचानक हृदयाची गती वाढते.
उष्माघातावरील उपाय –
- दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
- नारळपाणी, ताक, लिंबू पाणी प्यावे.
- चहा, कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन टाळावे कारण यामुळे डिहाड्रेशन वाढते.
- घाम शोषून घेणारे सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालावेत.
- डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी टोपी, सनग्लासेसचा वापर करावा.
- दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान बाहेर पडू नये.
- दुपारी उन्हातून बाहेर पडत असाल तर सावलीतून चालावे.
- बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
- शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- थंड पाण्याने आंघोळ करा.
- ताजी फळे खा, भाज्या, दही यासारखे हलके पदार्थ खावेत.
- तळलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.
- सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करावा.
हेही पाहा –
https://www.youtube.com/watch?v=gnjjmkwsvek