भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर सध्या आयपीएल 2025मध्ये कॉमेंट्री करत आहे. पण सध्या मुलापासून मुलगी बनलेल्या बांगर यांच्या मुलीची अनायाची एक मुलाखत चांगलीच गाजत आहे. अनायाने अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. अनाया पूर्वी मुलगा होती. आता तिने जेंडर चेंज करून मुलगी झाली. बराच काल लंडनमध्ये राहिल्यानंतर अनाया भारतात आली आहे. भारताच येताच तिने एक स्फोटक मुलाखत दिली आहे. एक मोठा भारतीय क्रिकेरट माझ्याशी संबंध ठेवू पाहत होता. तर काही खेळाडू मला घाणेरडे फोटो पाठवायचे, असं अनायाने म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अनाया बागंरने लल्लन टॉपला मुलाखत दिली आहे. यात तिने हा धक्कादायक खुलासा केला आहे. क्रिकेटर मला त्यांचे घाणेरडे फोटो पाठवायचे. ते म्हणायचे, चल कारमध्ये. आम्हाला तुझ्याशी संबंध ठेवायचे आहेत. काही क्रिकेटर तर मला सर्वांसमोर शिवीगाळ करायचे. नंतर मला फोटो मागायचे, असं अनायाने सांगितलं. जेंडर चेंज केल्यानंतर माझ्या वडिलांनी मला क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला. तुला क्रिकेट सोडलं पाहिजे. आता क्रिकेटमध्ये तुझ्यासाठी काहीच जागा उरली नाही, असं वडिलांनी म्हटल्याचं अनाया म्हणते.
वाचा: दादा कोंडके यांची झलक दिसते सूरजमध्ये; ‘झापुक झुपूक’मधील गाणे पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
उत्तम क्रिकेटपटू
अनाया बांगरने सांगितले की, सध्या आयपीएलमध्ये चमक दाखवत असलेल्या अनेक खेळाडूंमध्ये ती पूर्वी खेळलेली आहे. मुशीर खानसोबत अनाया अंडर-14 क्रिकेट खेळली आहे. तसेच, तिने सरफराज खान आणि यशस्वी जैस्वालसोबत एज ग्रुप क्रिकेटमध्ये भाग घेतला होता. क्रिकेट खेळताना तिला आपली ओळख लपवावी लागायची. ती लोक काय म्हणतील याचा विचार करायची. तिच्या मते, तिचे वडील संजय बांगर हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत, याचाही एक प्रकारचा मानसिक दबाव तिच्यावर होता.
अनायाचा खंत व्यक्त करणारा अनुभव
अनाया बांगरने व्यक्त केले की, तिला याचे दुःख आहे की महिलांच्या क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर्सना खेळण्याची परवानगी नाही. तिचा टेस्टोस्टेरॉन पातळी ही सामान्य मुलीप्रमाणेच आहे, तरीही तिला महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी दिली जात नाही, याची खंत तिने व्यक्त केली. अनायाने या मुलाखतीत हेही सांगितले की, जेव्हा ती आठ-नऊ वर्षांची होती, तेव्हा ती आईच्या कपाटातून कपडे काढून घालायची. तिला लहानपणापासूनच वाटायचे की ती एक मुलगी आहे.