राज्य सरकारकडून राबिवण्यात येणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचली. या योजनेमुळे महायुतीला यश प्राप्त झालं. मात्र, आता या योजनेवरून राजकारण सुरू आहे. या योजनेच्या निकषात काही बदल केल्यापासून विरोधकांनी टीकेची तोफ डागली. तसेच आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या ८ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहेय. म्हणजेच १५०० वरून ५०० रूपये मिळणार आहेत.
दरम्यान, सध्या लाभार्थी महिला या योजनेचा एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच ३० एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आतंरराष्ट्रीय महिला दिनी जमा झाला होता.
मात्र, एप्रिल महिना सुरू होऊन १६ दिवस उलटले. तरीही दहावाचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात काही जमा झालेला नाही. आता एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीया या सणाला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
लाडकींना १५०० वरून ५०० रूपये देण्यात येत आहे कारण..
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांना १५०० रूपये नसून ५०० रूपये मिळत आहेत, यावर आदिती तटकरे म्हणाल्या, 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना १५०० रूपये मिळत आहेत. मात्र काही लाभार्थी महिलांच्या खात्यात ५०० रूपये जमा होत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा लाभ. त्यामुळे त्यांच्या खात्यात ५०० रूपये जमा होत आहेत'.
अजित पवारांची हमी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही योजना कायम चालू राहणार आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे. ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार नाही. विरोधकांनी निवडणुकीनंतर योजनेत बदल झाल्याचा आरोप केला होता. मात्र, ही योजना अविरत चालू राहिल', असं म्हणालेत.