सकाळी उठून तुम्ही तुमचे नित्यकर्म करता. जसे शौचाला जाणे, आंघोळ करणे, ब्रश करणे हे तुम्ही रोजच करत असता. पण तुमच्या या रुटीनमधील एक चुक तुमच्या फायद्याऐवजी नुकसान करु शकते. दातांची सफाई त्यांचे फार काळ आरोग्यदायी रहाण्यासाठी आवश्यक आहे. परंतू ज्या टुथब्रशने आपण आपल्या दातांचे आरोग्य राखत असतो तोच ब्रश तुमचा दुश्मन असू शकतो. जर तु्म्ही बराच काळ एकाच टुथब्रशचा वापर करीत असाल तर तुमच्या तोंडाचे आरोग्य धोक्यात आले म्हणून समजा. हा ब्रश तुम्हाला आजारी पाडू शकतो. चला तर पाहूयात ब्रश नेमका केव्हा बदलायचा ?
बॅक्टेरिया आणि जर्म्सचे घर: कालांतराने तुमच्या टूथब्रशच्या ब्रेसल्स (दातांत) मध्ये बॅक्टेरिया, फंगस आणि प्लाक जमा होतो, दर दिवशी उपयोग केल्यानंतरही तो पूर्णपणे साफ होत नाहीत.
ब्रेसल्स घासले जाणे : टूथब्रशचे दांत घासून त्याचे तोंड दुमडले जातात. त्यामुळे त्यांनी तुमची दांत साफ करणे कठीण होते. जवळपास त्यांनी सफाई करणे कठीण असते.
प्रादुर्भावाचा धोका: जर तुम्हाला सर्दी, ताप किंवा तोंडात व्रण किंवा जखमा झाल्या आहेत. तर आजाराचे बॅक्टेरिया या ब्रशवरच राहातात आणि ते तुम्हाला पुन्हा पुन्हा आजारी पाडू शकतात.
अनेकजण टुथब्रश तोपर्यंत वापरतात जोपर्यंत त्यांचे ब्रेसल्स पूर्णपणे खराब होत नाहीत. परंतू हा निकष योग्य नाही. डेंटिस्ट्सच्या सल्ल्याने दर तीन महिन्यांनी तुम्ही तुमचा टुथब्रश बदलला पाहीजेत. जर त्या आधीही टुथब्रश जर खराब झाला तर तो बदलण्यास हरकत नाही. जर ब्रेसल्स पसरले असतील किंवा तुटले असतील, किंवा तुम्ही आजारी पडला असाल तर ( फ्लु किंवा गळ्याचे संक्रमण ) तरी तुमचा ब्रश तुम्हाला बदलावा लागेल. जर तुमच्या टुथब्रश मधून विचित्र वास येत असेल किंवा ब्रश करताना तोंडात जखम होत असेल तर या स्थितीतही तुमचा ब्रश तुम्हाला बदलावा लागेल.
लहान मुलांचे टुथब्रश लवकरच खराब होत असतात. कारण लहान मुले जोरजोराने ब्रश करीत असतात, तसेच ब्रसेल्सना चावत देखील असतात. त्यामुळे लहान मुलांचा टुथब्रश दर २-३ महिन्यांनी बदलावा जर गरज असेल तर त्या आधीही बदलू शकता.