भारतात सध्या आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. एकूण 10 संघांमध्ये एका ट्रॉफसाठी चुरस पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय आणि टी 20i संघासाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. इंग्लंडने हॅरी ब्रूक याची टी 20i आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. हॅरी ब्रूक याची जोस बटलरच्या जागी वर्णी लागली आहे. बटलरने काही दिवसांपूर्वीच कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. इंग्लंड क्रिकेट आणि आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.