डॉ. मृदुल देशपांडे - MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
अँटी-इन्फ्लेमेटरी (Anti-Inflammatory Diet) किंवा सूज कमी करणारा आहार यांविषयी आपण सध्या सोशल मीडियावर खूपदा ऐकलं असेल. रिसेंटली विद्या बालन त्याबद्दल बोलल्या. काय आहे हे अँटी-इन्फ्लेमेटरी डाएट? आजकाल थकवा, सांधेदुखी, त्वचेचे त्रास, अपचन, केसगळती, वजनवाढ, मधुमेह, उच्च रक्तदाब असे असंख्य त्रास सामान्य वाटतात; पण यामागे एक गुप्त कारण दडलेलं असतं - दीर्घकालीन सूज (Chronic Inflammation). ही सूज एखाद्या दुखापतीसारखी तात्पुरती नसून, दीर्घकाळ शरीरात दाटलेली आणि बिनआवाजे नुकसान करणारी असते.
फंक्शनल मेडिसिनच्या दृष्टिकोनातून, ‘क्रोनिक’ सूज ही अनेक दीर्घकालीन आजारांचं मूळ मानली जाते - जसे की हृदयरोग, मधुमेह, संधिवात, थायरॉईड विकार, पचनतंत्रातील विकृती, अगदी मेंदूच्या कार्यावरही परिणाम करणारे आजार.
या सुजेचा एक प्रभावी उपाय म्हणजे अँटी-इन्फ्लेमेटरी आहार. अन्न हे औषध असू शकतं, हे लक्षात घेणं इथे महत्त्वाचं ठरतं.
सूज कमी करणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश करारंगीत भाज्या व फळं : आवळा, हळद, पालक, गाजर, ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर - यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्युट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात.
धान्य : ज्वारी, बाजरी नाचणी किंवा भात – दररोज एकाच धान्य. मिक्स धान्यं टाळावीत
गुड फॅट्स : बदाम, अलसी बिया (जवस), पिस्ता, सर्व बियाणी (सनफ्लॉवर, पंपकीन सीड्स, चिया सीड्स), तीळ, अक्रोड, ऑलिव्ह तेल, खोबरेल तेल, खोबऱ्याचे तुकडे, फॅटी फिश इत्यादी – ही ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स शरीरातील सूज कमी करतात.
हळद, आल्यासारख्या मसाल्यांचा वापर : यामध्ये नैसर्गिक सूजविरोधी (Anti-Inflammatory) घटक असतात.
साखर आणि साखरयुक्त पदार्थ
प्रोसेस्ड फूड्स (जसं की पॅकेज्ड स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक्स)
परतलेले आणि ट्रान्स फॅटयुक्त पदार्थ
आपल्याला दिसणाऱ्या लक्षणांपलीकडे पाहून, त्यांच्या मुळाशी जाणं, हीच फंक्शनल मेडिसिनची खासियत आहे. जर सतत थकवा, पचनाच्या तक्रारी, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव असे त्रास होत असतील, तर ते क्रोनिक सुजेचे संकेत असू शकतात.
सुदृढ, नैसर्गिक आणि संतुलित आहार हा या सुजेला थोपवण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. फक्त उपचार नव्हे, तर मुळांवर उपचार, हाच फंक्शनल मेडिसिनचा आधार.