खूप राग आला तर काय करायचं? MS Dhoni म्हणतो...
esakal April 08, 2025 08:45 AM
MS Dhoni एमएस धोनी

भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो.

MS Dhoni कॅप्टन कूल

त्याला कॅप्टनकूल म्हणूनही ओळखतात. धोनीला चिडलेलं खूप क्वचित पाहाण्यात आलेलं आहे.

MS Dhoni पॉडकास्ट

पण, त्यालाही राग येतो, मात्र अशावेळी काय करणं सर्वोत्तम असतं, याबद्दल त्याने नुकतेच राज शमानी याच्या पॉडकास्टवर सांगितले आहे.

MS Dhoni राग आल्यावर काय करायचं

तो म्हणाला, जेव्हा राग येतो, तेव्हा कधीही काहीही न बोलणं उत्तम असतं. कारण रागात कोणीही तर्कशुद्ध बोलत नाही. त्यामुळे थोडावेळी शांत रहा.

MS Dhoni दोघात तिसरा नको

तो म्हणाला, जर मला राग आला तर मी तिसऱ्या वक्तीला काही नाही बोलायला हवं, ज्याच्यावर चिडलोय, तर तो त्याच्यापुरताच पाहिजे.

MS Dhoni परिस्थिती बदलते

राग आल्यानंतर तिसऱ्या वक्तीशी बोलतो, तेव्हा आपल्या भावना बदलतात. माझ्या भावनांचा परिणाम माझ्या निर्णयांवर नाही व्हायला पाहिजे, त्यामुळे कधीही पाच मिनिटांनंतर तुम्ही शांत होता आणि योग्य निर्णय घेऊ शकता.

MS Dhoni शांत रहायचं

धोनीच्या मते जेव्हा राग येतो, तेव्हा त्यावेळी लगेचच प्रतिक्रिया देण्यापेक्षा थोडावेळ त्यापासून लांब जाणं योग्य असतं, त्यामुळे राग शांत व्हायला मदत होते.

Mohammed Siraj IPL: सर्वाधिकवेळा डावात ४ विकेट्स घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.