बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा (Malaika Arora) कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. अलिकडेच तिचा आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा ब्रेकअप झाला आहे. त्याचे खूप वर्षांचे नाते संपले आहे. अशात आता मलायका अरोराने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मलायकाने इन्स्टाग्राम एक स्टोरी पोस्ट केली आहे.
"तुम्ही जितके मोठे व्हाल तितके संघर्षात/ अडचणीत शांतता आणि अनादरापेक्षा अंतर निवडता. ड्रामा तुमच्यासाठी असहिष्णू बनते आणि तुमची शांतता ही तुमची प्रायोरिटी बनते. तुम्ही आजूबाजूला असलेल्या चांगल्या लोकांसोबत वावरता. जे तुमचे आरोग्य, हृदय आणि आत्म्यासाठी उत्तम असते. "
2024 मध्ये दिवाळीतच कपूरने मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले होते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. अरोरा आणि अर्जुन कपूर 2018 पासून एकत्र होते. अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांनी तब्बल सहा वर्ष एकमेकांना डेट केले आणि आता ते वेगळे झाले आहेत.
बॉलिवूडमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा कायमच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत राहिले. अर्जुन कपूर हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आले. सध्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघे सुद्धा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये व्यस्त आहेत आणि आपल्या करिअरकडे लक्ष देताना दिसत आहे.