सोन्याची किंमत आणि स्लीव्हर दर: गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सोने (Gold Price) व चांदीच्या भावात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन दिवसात सोन्याच्या भावात 4000 हजाराने तर चांदीच्या भावात 11000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सराफ बाजारामध्ये सोने व चांदी (Silver Price) खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी होईल असा अंदाज असला तरी ग्राहक सोने खरेदी बाबत वेट अँड वॉच भूमिकेत असल्याच पाहायला मिळत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ध्येय धोरणांमुळे सोने व चांदीच्या भावात घसरण होत असल्याचं सोने व्यापारी यांनी म्हटलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणाचा परिणाम म्हणून जळगावच्या बाजारात सोनं हे घसरले असल्याचे मानले जात आहे. आजचा सोन्याचा भाव जीएसटीसह 91 हजार 260 तर चांदीचा भाव हा 92 हजार 700 असल्याच पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसात सोने व चांदीचा भाव घसरल्याने ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरात आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सुरु असलेल्या घडामोडींमुळे पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचा दर प्रतितोळा 55 हजारापर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीचे भाव सातत्याने खाली येत आहेत. सोन्याचा प्रतितोळा दर काही दिवसांपूर्वी 96 हजारांवर पोहोचला होता. तेव्हापासूनच तज्ज्ञांनी आगामी काळात सोन्याच्या घरात खूप मोठी घसरण होईल, असे म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले असले तरी एरवी झटक्यात वाढणारे सोन्याचे भाव उलट कमी होत आहेत. जगभरातील गुंतवणुकदार सोन्याकडे पारंपरिक आणि सर्वात सेफ गुंतवणूक म्हणून पाहतात. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांतील सोन्याचा भाव पाहता, गुंतवणुकदारांना सोन्यातील गुंतवणूक सध्याच्या घडीला जोखमीची वाटत असल्याचे दिसत आहे.
अमेरिकेतली मॉर्निंगस्टारचे रणनीतीकार जॉन मिल्स यांच्या अंदाजानुसार सोन्याच्या भावात 38 टक्क्यांची घसरण होऊ शकते. सोन्याचे दर घसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे सोन्याचं उत्पादन मोठ्याप्रमाणात वाढलं आहे. 2024 च्या दुसर्या तिमाहीत खाणकामामुळं होणारा नफा 950 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. सोन्याचा जागतिक साठी 9 टक्क्यांनी वाढून 2,16,265 टन झाला आहे. ऑस्ट्रेलियानं सोन्याचं उत्पादन वाढवलं आहे. तसेच रिसायकल सोन्याचा पुरवठा देखील वाढला आहे.
2024 मध्ये जगभरातील सेंट्रल बँकांनी 1,045 टन सोने खरेदी केले. मात्र, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या सर्व्हेनुसार, 71% सेंट्रल बँकर्स पुढील वर्षी सोने खरेदी कमी करू शकतात. केंद्रीय बँकांनी गेल्या वर्षी 1045 टन सोन्याची खरेदी केली होती, त्यांच्याकडून मागणी कमी केली जाऊ शकते. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या एका सर्व्हेनुसार 71 सेंट्र्ल बँकांनी सोन्याचा साठा कमी करणे किंवा जितका साठा आहे तितका कायम ठेवण्याचं नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे सोन्याची मागणी घटून भाव घसरण्याची शक्यता आहे.
https://www.youtube.com/watch?v=wguwnjzdkya
आणखी वाचा
अधिक पाहा..