Balasaheb Thackeray Nashik Speech : नाशकात पुन्हा एकदा गरजला बाळासाहेबांचा आवाज
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा … कार्यक्रमात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेलं भाषण ..,
कार्यक्रमातील इतर महत्वाचे मुद्दे..
दरम्यान उद्धव ठाकरेंनी या निर्धार मेळाव्यात भाषणावेळी अमित शाहांवर हल्लाबोल केला ..
रायगडवर बोलताना अमित शाहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस त्यावर गप्प बसून होते असंही उद्धव ठाकरे म्हणाले. सत्ता नसताना जे सोबती आहेत तेच निष्ठावान आहेत. बाळासाहेबांनी माझ्या पाठीशी पुण्याई उभी केली. त्यामुळे मला सत्तेची गरज नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते नाशिकच्या शिवसेना निर्धार मेळ्याव्यात बोलत होते.