Maharashtra News Live Updates: पुण्यातील गरवारे महाविद्यालयासमोर झाड कोसळले
Saam TV April 08, 2025 07:45 PM
Pune News: पुण्यातील गरवारे महाविद्यालयासमोर झाड कोसळले

झाडाखाली अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांना काढण्यात आल सुखरूप बाहेर

परंतु संपूर्ण रस्ता आता बंद करण्यात आला

अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले

एक रिक्षा व काही वाहने झाडाखाली अडकल्याची माहिती

दोन जण जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी घेऊन गेले आहेत

येरवड्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, महापालिकेच्या ठेकेदाराच्या पोकलेन मशीनच्या काचा फोडल्या

येरवडा लक्ष्मी नगर येथे महापालिकेच्या वतीने ड्रेणेज लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी पोकलेन मशीनचा वापर केला जात आहे.

दोन पोकलेन मशीनच्या काचा अज्ञातांनी फोडून दहशत निर्माण केली आहे. याबाबतची तक्रार महापालिकेचे कनिष्ठ अभियंता श्रीकांत फडतरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिली आहे.

तेवढ्यात कोयता यांची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही. वारंवार असे प्रकार होत असताना रहिवाशी भयभयीत झाले आहेत.

आता महापालिकेच्या ठेकेदाराच्या कामगारांना तलवार लावून धमकावणे, पोकलेन मशीन फोडणे असे प्रकार घडत असल्याने विकास कामे कशी होणार असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.

Water Crisis: यवतमाळच्या पाटण इथे भीषण पाणी टंचाई

यवतमाळच्या झरी तालुक्यातील पाटण इथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून यावर्षी पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने परिसरातील शेतशिवारातील विहीरीही कोरड्या पडल्या आहेत. विशेष म्हणजे पैनगंगा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने पाटण या गावातील नागरिकांना होत असलेला पाणीपुरवठा ठप्प झाल्याने गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन विहिरी पाहिल्यात परंतु त्या विहिरीची ही पाणी पातळी खाली गेल्याने तूर्त पाटणवाशींना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ, तापमान 40 शी पार गेल्याने नागरिक हैराण

बुलढाणा जिल्ह्याचे तापमान कधी नव्हे यावेळेस 40 पार गेले आहे.. तर खामगाव येथील तापमान 43 अंश नोंद झाली आहे...

जिल्ह्याचे घाटाखाली व घाटावर असे दोन भाग पडतात घाटावरील बुलढाणा शहरात तापमान कधी 40 पार गेले नव्हते मात्र यावर्षी तापमानत मोठी वाढ झाली असून 40 च्या कर तापमान गेले आहे...

एकेकाळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा शहरात आता उष्णता वाढली असून नागरिक हैराण झाले आहेत..

आरोग्य विभागाकडून उष्णतेपासून बच्चावं करण्यासाठी नागरिकाणी जास्त पाणी प्यावे, डोक्याला रुमाल बांधावा व काम असेल तरच घराबाहेर पडावे अश्या सूचना केल्या आहेत...

Washim: चार दिवसांपूर्वी केलेल्या डांबरी रस्त्याचं काम निकृष्ट, डांबरी रस्ता हाताने उकरला जातोय

वाशिमच्या वाशिम ते केकतउमरा डांबरी रस्त्याचे काम अत्यन्त निकृष्ट होत असल्याचं समोर आलंय..

अगदी चार दिवसापूर्वी केलेला रस्त्याचं काम थातुरमातुर केल्याने रस्त्यावर टाकलेलं डांबर हाताने गोळा होत असल्याने रस्ताच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होतय.

विदर्भा मराठवाड्याला जोडणाऱ्या अत्यंत जवळच्या मार्ग असून गेल्या अनेक महिन्यापासून नागरिक या रस्त्या दुरुस्त व्हावा अशी मागणी करत होते.

अनेक वेळा आंदोलन सुद्धा केल. मात्र, थातुरमातुर पद्धतीने लवकर काम उरकवून बिल काढण्याच्या नादात वाशिम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप नागरिक करत आहे.

त्यामुळे शासनाच्या करोडो रुपयांच्या निधीचा चुराडा होतोय.

डोंबिवली एमआयडीसी मिलाप नगर परिसरात काळे ठिपके प्रकरण

प्रदूषणामुळे काळे गाड्यावर, पत्र्यावर ,कपड्यावर काळे ठिपके पडल्याचा आरोप

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसे आक्रमक ,प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांची काढली खरडपट्टी

प्रदूषण नियंत्रण मंडळ यामधून नियंत्रण हा शब्द काढा ,महाराष्ट्र प्रदूषण मंडळ असं नाव ठेवा

कल्याण मधील कार्यलयात बसून डोंबिवली एम आय डी सी मधील प्रदूषण पाहता काय ??

मंडळाचे अधिकारी करतात काय ,कंपन्या मध्ये बसून असतात

मनसेने प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

जळगावात राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे कामगारांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

राज्यामध्ये त्या त्या जिल्ह्यांमध्ये नव्याने उद्योग येत आहेत या उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना संधी द्यावी या संदर्भातला राज्य शासनाचा निर्णय असून त्यानुसार जळगाव जिल्ह्यामध्ये स्थानिक भूमिती त्यांना नोकऱ्यांमध्ये संधी द्यावी या मागणीसाठी आज राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय समित आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्यासह कामगार प्रतिनिधींच्या वतीने मागण्याचे निवेदन देण्यात आले. मागणी मान्य झाली नाही तर या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा सुद्धा यावे यशवंत भोसले यांनी दिला आहे.

सुप्रिया सुळे पृथ्वीराज जाचक यांच्या भेटीला

दोनच दिवसापूर्वी अजित पवार आणि जाचक एकत्र छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज सुप्रिया सुळे पृथ्वीराज जाचक यांच्या भेटीला

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार पक्षाचे पॅनल असणार का? याकडे लक्ष

सुप्रिया सुळे आणि जाचक यांच्या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं

सुप्रिया सुळे यांचा पूर्वनियोजित दौरा असल्याचं जाचक यांनी सांगितलं

Solapur: सोलापूर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निवास मधील खोलीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू

चंद्रकांत धोत्रे अस मृत कार्यकर्त्याच नाव

हृदयविकाराचा झटका आल्याने झाला मृत्यू

चंद्रकांत धोत्रे यांना वेळेत ॲम्बुलन्स न मिळाल्याने जीव गमावावा लागल्याचा मृत कुटुंबियांचा आरोप

त्यामुळे आमदार निवास परिसरात कायम ॲम्बुलन्सची सोय करावी अशी मागणी चंद्रकांत धोत्रे यांचा मुलगा विशाल धोत्रेने केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक रामाशिष यादव यांच्यावर ऍट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल

रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

मागील 20 वर्षांपासून महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन बलात्कार केल्याचा आरोप.

महिलेला औषधं देऊन अनेक वेळा गर्भपात केल्याचा देखील आरोप.

यातून एक मुलगा जन्माला आला असून मुलाला स्वीकारण्यास देखील रामाशिष यादव याने नकार दिल्याचा महिलेचा आरोप.

यासोबतच जातीवाचक शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल.

वणीत ठाकरे गटाकडून कृषीमंत्र्याच्या व्यक्तव्याचा निषेध

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी विरोधी केलेल्या वक्तव्याचा यवतमाळच्या वणी शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी उपविभागीय कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संजय देरकर यांनी दिला असून यावेळी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील खासगी आणि धर्मादाय रुग्णालयाचे बिल आकारणीचे तपासणी करण्याची मागणी

जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकारी आणि सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यानी निवेदन देऊन मागणी केली.

पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांची नोंदणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून केली जाते.तर अनेक रुग्णालय हे नोंदणी न करताच सुरु झाले आहेत.

या सर्व रुग्णालयांकडून अनेकदा रुग्णांना अवाजवी बिले आकारली जातात. काहीवेळा पैसे नाहीत म्हणून रुग्णांना उपचार नाकारले जात असल्याचे l निवेदनाद्वारे सांगण्यात आले.

ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नागरिकांचे याबाबतचे अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन असावी, त्याचबरोबर उपचार आणि बिलासंबंधी येणारे तक्रारीचे निवारण करणे, बिलाचे परीक्षण करण्यासाठी प्रशासनाची एक समिती असली पाहिजे. अशा तक्रारींची तातडीने दखल घेऊन कार्यवाही होण्याची गरज आहे.

गरज नसलेल्या औषधे रुग्णांना खरेदी करायला लावली जातात.तक्रार येईल अशा मेडिकल बिलांची देखील तपासणी करण्याची व्यवस्था करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील खिडक्यांच्या खाली कचऱ्याचे ढिग

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील कार्यालय साफ तर मागच्या बाजूला खिडक्यांच्या खाली कचऱ्याचे ढिग साचले आहेत.

खिडकीलगतच्या भिंतींवर साचलेली घाण आणि आजूबाजूला पडलेले कचऱ्याचे ढीग पाहता, प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याव समोर आलं आहे.

इतक्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ही परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे स्वच्छ भारत अभियानालाही फाटा मिळतोय का, असा सवाल आता विचारला जात आहे.

प्रशासनाने तातडीने लक्ष घालून परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

Nanded: नांदेडच्या माळटेकडी भागात फर्निचरच्या काका कुशन गोडाऊनला आग

नांदेड शहरातील माळटेकडी भागात अचानक काका कुशन फर्निचरच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे.

यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र वेळीच अग्निशमन दलाची गाडी तिथे पोहोचल्याने ही आग इतरत्र पोहोचली नाही,

अग्निशामन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून ही आग विझवली आहे.या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Nanded: नांदेड शहरात पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन

नांदेड शहरातील मगनपुरा भागातील रहिवाशांनी शोले स्टाईल आंदोलन केले. मागील दोन महिन्यापासून मगनपुरा भागात तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाहीये.

त्यामुळे मगनपुरा भागातील रहिवाशांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून शहरातील मगनपुरा भागात नळाला पाणी न आलेल्या संतापलेल्या नागरिकांनी चक्क पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केले आहे.

महानगरपालिकेचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पाणी देण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.

उजनी धरणातील अवैध मासेमारी विरोधात कारवाई

उजनी धरणातील अवैध मासेमारी विरोधात जलसंपदा विभाग व करमाळा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.

कारवाई दरम्यान मासेमारीसाठी वापरले जाणारे साहित्य जाळून नष्ट करण्यात आले. दरम्यान आरोपी पळून गेले.

करमाळा तालुक्यातील कात्रज,टाकळी,केत्तूर या परिसरात वडाप व पंड्याच्या सहाय्याने अवैध मासेमारी सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाला मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. अवैध आणि बेसुमार मासेमारी मुळे उजनीतील अनेक दुर्मिळ माशांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

अमरावती विमानतळ लोकार्पण सोहळा 16 एप्रिलला

अमरावती विमानतळावरून 72 सीटर प्रवासी विमान उडणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ तर उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती

अलायन्स एअर कडून 10 तारखेपासून 3 सेक्टर उड्डाणं साठी तिकीट बुकींग सुरु करणार आहे

आठवड्यात 3 दिवस सोमवार, बुधवार, शुक्रवार अमरावती- मुंबई व मुंबई -अमरावती प्रवासी सेवा सुरु होणार आहे

सकाळी 8.45 अमरावती वरून टेक ऑफ करून मुंबई ला 10 वाजता मुंबई पोहचेल

त्याचं दिवशी सायंकाळी 5 वाजता मुंबई वरून टेक ऑफ करेल 6.15 मी अमरावती ला पोहचेल

या वेळापत्रक मध्ये अंशत बदल होऊ सकते

वर्षभरात रेल्वेच्या भुसावळ रेल्वे विभाग कडून साडेसात लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई ५६ कोटीचा दंड

भुसावळ मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने नुकतेच संपलेले आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये साडेसात लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली.

या फुकट्या प्रवाशांकडून तब्बल ५६ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. भुसावळ विभागातील वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांसह गाड्यांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत हे फुकटे प्रवासी आढळून आले आहेत.

रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास, सामान्य तिकीट काढून आरक्षित डब्यातून प्रवास, निम्न श्रेणीचे तिकीट असताना उच्च श्रेणीतून प्रवास, विनातिकीट फलाटावर वावर आदी

तुळजापूर शहरातील रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी तुळजापूर मधील नागरिकांकडून अर्ध नग्न बोंब मारो आंदोलन

तुळजापूर शहरातील रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी तुळजापूर मधील नागरिकांकडून अर्ध नग्न बोंब मारो आंदोलन करण्यात आले. तुळजापूर शहर विकास प्राधिकरणांतर्गत हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती रस्ता लवकरात लवकर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून या नियोजित रस्त्याचे काम प्रलंबित आहे.रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी, व्यावसायिक व भक्तांना याचा लाभ होणार आहे.

धाराशिव जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास बंदी

धाराशिव जिल्ह्यात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, परीसर शासकीय व खाजगी आस्थापना, शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्था तसेच शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणे धार्मिक स्थळे,पर्यटनस्थळे यासह इतर ठिकाणी तंबाखुमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य कायदा २००३ च्या कलम ४ मधील तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास व धुम्रपानावर बंदी तर १८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखूजन्य उत्पादने विक्रीस मनाई व शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात अशी विक्री करता येणार नाही

याबाबत फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

चैत्री एकादशी निमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न

आज चैत्री शुद्ध कामदा एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली.

श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे व श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.

महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकही मोठ्या प्रमाणात पंढरपुरात दाखल झाले आहेत.

चंद्रभागा स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मठ आणि मंदिरांमध्ये विठ्ठल नामाचा एकच गजर सुरू आहे. महाद्वार संत नामदेव पायरी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. विठ्ठल पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड पर्यंत गेली. एकादशीच्या सोहळ्यासाठी तीन लाख भाविक दाखल झाले आहेत.

कळंब येथील मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपीचे मोबाईलही पोलिसांनी केले जप्त

मयत महिला मनीषा बिडवेचा मोबाईलही आरोपीच्या घरातून पोलिसांनी घेतला होता ताब्यात

मयत महिलेसह आरोपीचे मोबाईल पोलीस फॉरेन्सिक लॅबला पाठवणार

मुंबई येथील फॉरेन्सिक लॅबमधील तपासणीतून पुढील उलगडा होणार

संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी महिलेचा संबंध आहे का ?, मोबाईल पडताळणी नंतर समोर येणार

मयत महिलेचा मोबाईल आरोपींनी घरात लपवून ठेवला होता, त्यांनी मोबाईल मधील डिलीट केलेला डाटाही रिकव्हर केला जाणार

वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे 1 तास वनसंरक्षण कार्यालयात ठिय्या

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर नेतृत्वात मुख्य संरक्षण कार्यालयात एक तास ठिय्या आंदोलन केले.

तसेच नुकसान भरपाईची मागणी सुद्धा रेटून धरली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वन्य प्राणी, नीलगाय, जंगली जनावरे,जंगली वराह इतर वन्य प्राण्यांच्या हौदोसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे.

मात्र वनविभागाने पीक नुकसान भरपाई चे अर्ज नामंजूर केल्याचा आरोप ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांनी केला तर तुटपुंज नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात येते व त्यात वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना हेलपाटे घ्यावे लागत आहे,असा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ११ एप्रिलपासून एसी स्पेशल गाडी

उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस ११ एप्रिलपासून धावणार आहे. ही गाडी एकूण २२ एलएचबी तसेच संपूर्ण वातानूकुलित असेल.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लो. टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक वातानुकूलित एक्स्प्रेस ११ एप्रिल ते २३ मे २०२५ या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे.

ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १० वा. १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात ही गाडी १२ एप्रिल ते २४ मे या कालावधीत करमाळी येथून सुटणार आहे. ही गाडी करमाळी येथून दुपारी अडीच वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वा. ५ मिनिटांनी ती मुंबईत लो. टिळक टर्मिनसला पोहचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थिवी या स्थानकांवर थांबणार आहे.

तातडीच्या उपचारांसाठी अनामत रक्कम घेऊ नका, महापालिकेकडून खासगी रुग्णालयांना नोटीस

पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारांसंदर्भात पाठवली नोटीस

तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये

रुग्णावर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावे, असे महापालिकेने रुग्णालयांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद

महापालिकेच्या या भूमिकेमुळे तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणारे रूग्ण व त्यांच्या नातेवाइकांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तातडीचे उपचार न केल्याने तनिषा भिसे या गरोदर मातेच्या मृत्यूची घटना नुकतीच घडली

पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, रुग्णालये यांना संबंधित नोटीस

Pune Water Supply: पुणे शहरातील काही भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद

खडकवासला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणाऱ्या रॉ वॉटर लाईन सांडपाणी वाहिनीच्या कामामुळे फुटल्याने पाणीपुरवठा राहणार बंद

ही गळती थांबवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आज दुरुस्तीची कामे हाती घेतली असल्याने शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे

वारजे, शिवणे औद्याोगिक परिसर, कर्वेनगर, शिवाजीनगर, गोखलेनगर, भोसलेनगर, पाषाण, बाणेर, बालेवाडी, कोथरूड आणि खडकीचा काही भाग येथील पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे

दुरुस्ती कालावधीमध्ये टँकरने केला जाणारा पाणी पुरवठा देणे शक्य होणार नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे

Heatwave: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पारा ४० अंशाच्या पुढे

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर

अमरावती आणि चंद्रपूर मध्ये ४३.६ अंश तापमानाची नोंद

नागपूर, वर्धा, यवतमाळ मध्ये पारा ४२ अंशावर

परभणी मध्ये ४२.१, बीड मध्ये ४१.९ तर छत्रपती संभाजीनगर मध्ये ४१ अंश तापमानाची नोंद

सोलापूर मध्ये ४२, मालेगाव मध्ये ४१.६ तर नाशिक मध्ये ४० अंश तापमानाची नोंद

पुणे शहरात सुद्धा ४२ अंश तापमानाची नोंद

Pune News: पुण्यात काँग्रेस चे डॉ. रोहित टिळक यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट

बनावट फेसबुक अकाऊंट वरून पैशांची मागणी

रोहित टिळक यांचे बनावट अकाउंट तयार करून त्यांच्या नावाने अनेकांना पैश्यांची मागणी केल्याचे मेसेज

रोहित टिळक यांचे नाव वापरून १५००० रुपयांची केली मागणी

डॉ. रोहित टिळक लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त

विधानपरिषदेचे दिवंगत माजी सभापती व काँग्रेसचे नेते जयंतराव टिळक यांचे ते नातू

नाशिकच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पुणे दौरा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेपक्षाचा पुण्यात होणार संवाद मेळावा

पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीने शाखाप्रमुख शिवसैनिकांशी साधणार संवाद

नाशिकच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचं पुणे नियोजन

दीनानाथ मंगेशकर प्रकरणात पुणे पोलिसांकडून चौकशी पूर्ण

या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचे पुणे पोलिसांनी नोंदवले जबाब

रुगणालयाच रेकॉर्ड , सीसीटीव्ही फुटेजही पोलीसांनी तपासल

आज कीवा उद्या पुणे पोलिसांच्या चौकशीचा अहवाल ससून च्या अधीक्षकांना दिला जाणार

चौकशी अहवालावर मेडिकल कमिटी घेणार निर्मय

पुणे पोलिसांकडून चौकशी पूर्ण

शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचा उपजिल्हाप्रमुख निघाला मटका बुकी चालक

सुरज कोठावळे असे मटका बुक्की चालक युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखाचे नाव

तुळजापूर येथील बस स्थानक परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली असता आला आढळून

पोलिसांनी 1890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कोठावळे याच्या सह इतर एका आरोपीविरोधात तुळजापूर पोलिसात नोंद केला गुन्हा

सुरज कोठावळे याचे शिंदे यांच्या शिवसेनेतील बड्या नेत्यांसोबत फोटो

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.