Raid 2 Trailer: "एक तरफ सत्ता, दुसरी तरफ सच..."; राजाजीनंतर अमेय पटनायकच्या रडारवर 'दादाभाई', ७५ वी Raid होणार का यशस्वी ?
Saam TV April 08, 2025 09:45 PM

बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) कायम आपल्या चित्रपटामुळे चांगलचा चर्चेत असतो. त्याला बॉलिवूडमध्ये ॲक्शन किंग म्हणून ओळखले जाते. लवकरच अजय देवगण 'रेड 2' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'रेड 2' (Raid 2 Trailer) चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत रितेश देशमुख पाहायला मिळणार आहे.

'2'मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळणार आहे. 'रेड 2'च्या ट्रेलरला हटके कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "एक तरफ सत्ता, दुसरी तरफ सच - ये RAID अब और बडी हो चुकी है..." या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की, दादाभाईच्या घरी अमेय पटनायक रेड मारायला येतो. आता ही रेड किती यशस्वी होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'रेड 2' चित्रपटात देशमुख दादाभाईच्या भूमिकेत आहे. आणि रितेश सोबतच या चित्रपटात वाणी कपूर, सौरभ शुक्ला हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. 'रेड 2' 1 मे 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रेड' चित्रपट सुपरहिट ठरला होता. 'रेड 2' हा ॲक्शन चित्रपट आहे.

'रेड' 2018 ला प्रदर्शित झाला होता. आता सात वर्षांनी 'रेड 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रेड 2'मध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. 'रेड 2' चित्रपटाचे दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.