चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात एकूण 30 सामने झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने 16, तर पंजाब किंग्सने 14 सामन्यात विजय मिळवला आहे.पंजाब किंग्सने मागच्या काही वर्षात चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचं पाणी पाजलं आहे. 2022 पासून पाचपैकी 4 सामने जिंकले आहेत. मुल्लानपूर येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या हंगामातील हा दुसरा सामना आहे. पहिला सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. यात पाहुण्या राजस्थान रॉयल्सने एकतर्फी विजय मिळवला. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाबच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने यावेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी घेणार आहोत. कारण आपण आपल्या फलंदाजीच्या क्रमवारीबद्दल चर्चा केली होती आणि त्याचा सर्वोत्तम वापर करण्याची आवश्यकता आहे. गेल्या सामन्यात दव जास्त नव्हता पण ते आपल्या नियंत्रणात नव्हते पण आपल्याला ताकदवान खेळाडूंना मागे टाकण्याची आवश्यकता आहे. आपण त्याच संघासह खेळणार आहोत. आमच्या संघात खरोखर चांगले गोलंदाज आहेत पण विशिष्ट प्रसंगी त्यांचा वापर कसा करायचा हे महत्त्वाचे आहे. गेल्या सामन्यात चेंडू फारसा वळत नव्हता, याचे श्रेय राजस्थानच्या फलंदाजांनाही द्यायला हवे.
ऋतुराज गायकवाड म्हणाला की, आम्हीही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. खेळपट्टी खूपच कोरडी होती, आमच्यासाठी नवीन परिस्थिती होती आणि आम्हाला शक्य तितक्या लवकर जुळवून घेण्याची गरज होती. आम्ही चांगली गोलंदाजी करत होतो पण आम्ही एका डावात दोनदा प्रति षटक 15 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत, आशा आहे की आम्ही त्यात सुधारणा करू शकू. आम्ही त्याच टीमसह मैदानात उतरणार आहोत.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पाथिराना