ऊर्से, ता. ८ : पवन मावळातील डोणे येथील ग्रामदैवत डोणू आईच्या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तीन एप्रिलपासून हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा सुरू झाला. या निमित्ताने व्यासपीठ कलश, वीणा, मृदंग, टाळपूजन करण्यात आले.
सोहळ्यात दररोज पहाटे काकड आरती, गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, भजन व हरिजागर आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात किसन महाराज भोईर, विठ्ठल महाराज धोंडे, ओंकार महाराज दुडे, पंढरीनाथ महाराज आरव, गणेश महाराज कारले, दिगंबर महाराज नलावडे, बाळकृष्ण महाराज कोंडे व कालिदास महाराज टिळे आदींच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. ९ व १० एप्रिल रोजी देवीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाईल. सायंकाळी देवीची पालखी छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन हनुमान तरुण मंडळ, भैरवनाथ तरुण मंडळ, भजनी मंडळ, डोणूआई मित्रमंडळ यांच्यासह ग्रामस्थ करत आहेत.